छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटली, की फराळ, चकली, शंकरपाळे, चिवडा अशा विविध पदार्थांची मेजवानी असते. घराघरांत हे पदार्थ तयार केले जातात. गेल्या काही वर्षांपासून रेडिमेड फराळाची मागणी वाढत आहे.
यामुळे दिवाळीनिमित्त फराळ विक्रीची शहरात सर्वच भागात दुकाने थाटलेली आहेत. वाढत्या महागाईत फराळांच्या किमतीत ४० ते ६० रुपयांनी वाढल्या आहेत. दिवाळीत फराळ हा २४० ते २६० रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे यंदा शहरात हजारो टन फराळ विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
शहरात छोटी-मोठी एक ते दोन हजार फरसाण विक्रीची दुकाने आहेत. यासह घरगुती फरसाण तयार करणाऱ्यांच्या दुकानावर खरेदीसाठी गर्दी होत आहे. यातील चिवडा-चकल्यांना लोक पसंती देत आहेत. पुंडलिकनगर रोडवरील अभिजित उमरे म्हणाले, की यंदाच्या दिवाळीत फराळ विक्री जोमात आहे. एका-एका भागात दहा ते २० दुकाने आहेत. प्रत्येक दुकानावर खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे.
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात असल्यामुळे यंदा ६० रुपयांपर्यंत दरवाढ झाली. तेलाच्या किमती आवाक्यात नसत्या तर किमती किलोमागे ८० ते १०० रुपयांपर्यंत गेल्या असत्या. यंदा लोक खर्च करताहेत, आवडीचे पदार्थ खरेदी करीत असल्याने बाजारपेठेतील उलाढालीत प्रचंड वाढ झाली आहे.
पदार्थांचे तुलनात्मक दर
पदार्थाचे नाव -गेल्या वर्षीचे दर - यंदाचे दर (किलो)
फरसाण - २०० ते २२० - २४० ते २६० रुपये
शंकर पाळे -२००रुपये - २४० रुपये
करंजी- ३०० रुपये- ४०० रुपये
चकली- २५० रुपये किलो -२५० रुपये
लसूण शेव -२४० रुपये - २०० ते २२०
खट्टामिठा शेव -२४० रुपये -२०० ते २२०
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फरसाणच्या किमतीत ४० ते ६० रुपयांची वाढ झाली. भावनगर, गाठीपापडी, चकली, शंकरपाळे, चिवड्याला मागणी आहे. खरेदीसाठी गर्दी वाढत असल्यामुळे शहरात फराळ विक्री करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली.
— अभिजित उमरे, फरसाण विक्रेते, पुंडलिनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.