छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक भाषेत व्यावसायिक शिक्षण हवे : डॉ. प्रमोद येवले

- अतुल पाटील

प्रगत राष्ट्रांमधील शिक्षणातील प्रादेशिक भाषेची संकल्पना नव्या शैक्षणिक धोरणातून अंतर्भूत असल्याने त्याचा लाभच होईल, असे स्पष्ट मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मांडले.

औरंगाबाद : ‘एआयसीटीई’ने इंग्रजीसोबत आठ प्रादेशिक भाषेत अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे. त्यात मराठी भाषेचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर, एक अभ्यासक्रम पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरूही झाला आहे. त्यामुळे आता इंग्रजीचा बाऊ करण्याची गरज नाही. सध्या प्राथमिक शिक्षण इंग्रजीत देण्याकडे पालकांचा कल आहे. आपल्याला जे शिक्षण मिळाले नाही, ते मुलाला देण्याच्या विचारातून हा प्रकार पुढे येत आहे. मात्र, मुलांचे शिक्षण आणि पालकांचे ज्ञान यात तफावत निर्माण होत आहे. याउलट, प्रादेशिक भाषेत व्यावसायिक शिक्षण मिळाल्यास समजून घेण्याची क्षमता अधिक असते. प्रगत राष्ट्रांमधील शिक्षणातील प्रादेशिक भाषेची संकल्पना नव्या शैक्षणिक धोरणातून अंतर्भूत असल्याने त्याचा लाभच होईल, असे स्पष्ट मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (dr. pramod yeole) यांनी मांडले. (dr. babasaheb ambedkar marathwada university vice chancellor of dr. pramod yeole said vocational education should be in the regional language)

‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या २२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘उच्चशिक्षणातील आव्हाने’ या विषयावर डॉ. प्रमोद येवले यांनी विशेष फेसबुक लाइव्हद्वारे मार्गदर्शन केले. ‘सकाळ’चे निवासी संपादक दयानंद माने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. येवले म्हणाले, ‘‘मराठवाड्याला सर्वकाही उशिरा मिळाले. निजाम राजवटीतून मुक्त झाल्यानंतर मराठवाड्यासमोर अनेक आव्हाने आहेत, त्यात सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रास या अविकसित प्रदेशाला तोंड द्यावे लागले. उच्चशिक्षणच काय? प्राथमिक शिक्षणाची वानवा होती. मराठवाड्यात संख्यात्मक वाढ झाली मात्र, ती वाढ गुणात्मक झाली का नाही याचे विश्‍लेषण करावे लागेल.’’

मराठवाड्याचा ग्रॉस एनरॉलमेंट रेशो वाढवायचा आहे. १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थी उच्चशिक्षणात कसे येतील, यासाठी विचार सुरू आहे. नवे शैक्षणिक धोरण येत आहे, यात २०३० पर्यंत हा देशाचा ग्रॉस एनरॉलमेंट रेशो ५० टक्के करावा, असे यूजीसी आणि केंद्र सरकारचे भाकीत आहे. शिक्षणतज्ज्ञासमोर एक प्रश्‍न आहे, या उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला काम देणे. शासन आणि समाजासमोरही हे आव्हान आहे. कारण सुशिक्षित हातांना काम दिले नाही, त्यांना कुठे गुंतवले नाही तर, ते विध्वंसक वृत्तीकडे जातील. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, उच्चशिक्षणाचे प्रवाह, जागतिक स्तरावर उच्चशिक्षण कशाप्रकारे घेतले जाते. याचे ज्ञान कुलगुरूंना व्हावे, यासाठी ‘सकाळ’ एज्युकॉन परिषदेमार्फत प्रयत्न करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कुलगुरू म्हणाले....

मराठवाड्याचा रेशो २८.३४ टक्के

देशाचा ग्रॉस एनरॉलमेंट रेशो २५.८ टक्के आहे. मराठवाड्याचा विचार करता, औरंगाबादचा ४३, जालना २०, बीड २०, उस्मानाबादचा १९ टक्के आहे. नांदेड ३८, परभणी १३.७३, लातूर १७.३१ आणि हिंगोलीचा १०.२४ आहे. यात मराठवाड्याचा २८.३४ टक्के इतका आहे.

५०० संशोधकांना शिष्यवृत्ती

कौशल्याधिष्ठित आणि उद्योजकता विकसित करण्याचे कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. ५२ टक्के लोक २९ च्या वयाची आहे. जग वृद्धत्वाकडे जात असताना भारत तरुण होत आहे. विद्यापीठात ५०० संशोधकांना शिष्यवृत्ती दिली जाते. दिशा देण्याचे संशोधन सुरू आहे.

मूल्यांकनातील चार फॅक्टर

एक्पॅन्शन, एक्सलन्स, इक्विटी, एम्प्लॉयमेंट हे चार फॅक्टर महत्त्वाचे आहेत. संख्यात्मक वाढ झाली आहे, गुणवत्ता नाही. ते वाढवण्याचे काम महाविद्यालयांचे आहे. जबाबदारी प्रत्येकाने ओळखली आहे. मुलांच्या तुलनेत मुली आणि इतर संवर्गातील लोक कमी आहेत.

स्वावलंबी व्हा हाच संदेश

देशाचा एम्प्लॉयमेंट रेशो १९९१ मध्ये २७ टक्के होता. २०१३ मध्ये १५, २०१५ मध्ये १० तर आता सात टक्के इतका आहे. तेवढ्याच लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी स्वावलंबी शिक्षण देणे गरजेचे आहे. याप्रकारचे आव्हान शिक्षण संस्थांसमोर आहे.

पदवीसोबत हवे कौशल्य

शासनाकडे आधीच अतिरिक्त रोजगार झाल्याने पगारावर जास्त खर्च होत आहे. विद्यापीठाची पदवी घेऊन विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभा राहू शकत नाही. त्याला कौशल्य किंवा उद्योजकता विकासही झाला पाहिजे. ‘वन टीचर वन स्किल’ ही संकल्पना विद्यापीठात आली पाहिजे.

‘एआय’मध्ये आपला देश पुढे

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चे दिवस आहेत. इंडस्ट्री ४.० येत आहे. ‘एआय’मध्ये आपला देश पुढे आहे. यामुळे जगात २३ हजार कोटी नोकऱ्या धोक्यात येतील. मात्र, नव्याने २५ हजार कोटी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ही मोठी उपलब्धी आहे.

जीवनशैलीपेक्षा जीवनमूल्ये वाढवा

बदलत्या काळात माइंडसेट बदला. वर्गातील खडू आणि फळा जात प्रोजेक्टर, एलसीडी , पीपीटी आले. आता झूम, वेबेक्स आहे. ‘आपली जीवनशैली वाढवण्यापेक्षा जीवनमूल्ये वाढवली पाहिजेत.’ या गोष्टी कोरोनाने आपल्याला शिकवल्या आहेत.

(dr. babasaheb ambedkar marathwada university vice chancellor of dr. pramod yeole said vocational education should be in the regional language)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT