dragon fruit 
छत्रपती संभाजीनगर

ड्रॅगन फ्रूट: जालन्याचे शेतकरी दुष्काळी भागात घेतायत परदेशी पीक

सुधीर काकडे

अनिश्चित पाऊस, सिंचनाचा अभाव आणि परिणामी अडचणीत सापडलेला शेतकरी यामुळं मराठवाड्यातला शेतकरी आणि संकट असं समीकरण तयार झालंय.

अनिश्चित पाऊस, सिंचनाचा अभाव आणि परिणामी अडचणीत सापडलेला शेतकरी यामुळं मराठवाड्यातला शेतकरी आणि संकट असं समीकरण तयार झालंय. पेरणी केली तर पाऊस पडत नाही, पाऊस पडला आणि पीक आलंच तर गारपीटीनं झोडपलं जात, योगा-योगानं पीक आलच तर भाव मिळत नाही. या सगळ्यात शेतकरी पुरता भरडला जात असल्याचं चित्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाहायला मिळतंय. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी तग धरुन राहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. (Dragon fruit cultivation flourishes in drought prone areas article by sudhir kakde)

मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाच्या झळा बसतात. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या आणि केंद्रीय पथकांचे पाहणी दौरे सुरू असता. मात्र याच जालना जिल्ह्यात आता शेतकरी परदेशी फळ पिकवण्याचे प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय.

dragon fruit

जालन्यातल्या बदनापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या घाटी शिरसगाव येथील तरुण शेतकरी अजय शेजुळ यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जुलै 2020 मध्ये आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राथमिक माहिती मिळवली. सांगलीतल्या एका नर्सरी मधून त्यांनी ही रोपं मागवली आणि तर्कशुद्ध पद्धतीनं लागवड केली. त्यासाठी शेतात 12 बाय 8 अंतरावर खड्डे खोदून सीमेंट पोल रोवले. त्या पोलच्या भोवती मातीचे बेड तयार करून, एका पोल भोवती 4 रोप या पद्धतीनं लागवड केली. आता त्यांच्या या ड्रॅगन फ्रुटच्या रोपांना कळ्या लागल्या असून येत्या काही दिवसात त्या फळ लागणार आहे. आता पर्यंत हे पीक नवं असलं तरी आम्हाला अजून तरी कोणतीही अडचण आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

dragon fruit

याबद्दल बोलताना अजय सांगतात की, “दुष्काळी परिस्थिती, निसर्गाचा असमतोल यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले. त्यामुळे आता आपल्याला आधुनिक शेतीचे प्रयोग करून पाहावेच लागणार या हेतूनं आम्ही ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.' लागवड झाली, फळ आलं तरीही त्याला बाजारात मिळणाऱ्या भावावरूनच फायदा किंवा तोटा ठरू शकतो. ड्रॅगन फ्रुटचा बाजारभाव आणि विक्री करताना काही अडचणी येतात का हे जाणून घेण्यासाठी आम्ही जाफराबाद तालुक्यात राहणाऱ्या विष्णू रामदास बारगळ यांच्याशी संपर्क साधला.

विष्णू आणि त्यांच्या वडिलांनी शेतीमध्ये नवा प्रयोग करण्याच्या विचारात 2016 मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यानंतर आतापर्यंत त्यांना पिकातून मिळालेल्या नफ्याबद्दल जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. रामदास बारगळ आणि त्यांचा मुलगा विष्णू यांनी सांगितलं की, "सुरुवातीला ड्रॅगन फ्रुटची लागवड केली तेव्हा हे सक्सेस होईन का नाई भरोसा नव्हता. पण फळ आलं. पहिला फ्लॅश सोडून आम्ही दुसऱ्या वेळेस आलेलं फळ काढलं. सेंद्रिय खत वापरलं, जेणेकरून फळाचं चांगलं पोषण झालं पाहिजे."

dragon fruit

फळ आल्यानंतर पहिल्यांदा बाजरात घेऊन जाताना किंवा विक्री करताना बऱ्याच अडचणी आल्याचं देखील बारगळ यांनी यावेळी सांगितलं. "आपल्याकडच्या लोकांना हे फळ जास्त माहिती नाही, फळ महाग आहे, म्हणून सुरुवातीला कोणी घेतंच नव्हतं. मग आम्ही औरंगाबादला आणि पुण्याला घेऊन गेलो, तर तिथं चांगला भाव भेटला. आतापर्यंत विकलेल्या मालात एक फळ कमीत कमी 55 रुपये तर जास्तीत जास्त 160 रुपयांना आम्ही विकलं, आतापर्यंत तरी आम्हाला कोणतीच अडचण आली नसून चांगला फायदा झाला"

dragon fruit

मराठवाड्यातल्या पावसाचं प्रमाण, सिंचन किंवा कालव्यांचा अभाव यामुळं कमीत कमी पाण्यात येणारी अशी पिके उपयुक्त ठरणार आहेत. तरीदेखील जोपर्यंत या विदेशी पिकांसाठीचं मार्केट तयार होणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे.

( सुधिर काकडे

sudhirkakde45@gmail.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT