धाराशिव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी (ता. १३) तीन तालुक्यात पाहणी करणार आहे. धाराशिव, लोहारा आणि वाशी तालुक्यातील शेतीची पाहणी पथकाकडून केली जाणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या वर्षात दुष्काळाचे तीव्र संकेत मिळत आहेत. खरीपाच्या हंगामात पाऊस झाला नाही. परिणामी यंदा काही शेतकऱ्यांना रब्बीची दुबार पेरणी करूनही काहीच हाती लागत नसल्याचे चित्र आहे. महसूल तसेच कृषी विभागाने जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल शासन स्तरावर पाठविला आहे. त्याच अनुषंघाने केंद्रीय पथक बुधवारी जिल्ह्यात येत आहे.
पथकातील प्रतिनिधी
पथकाकडून तीन तालुक्यात पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी अव्वर सचीव मनोज कुमार, केंद्रीय ग्रामविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त मोतीराम, निती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचंद्र मिना यांचा पथकात समावेश असणार आहे.
येथे करणार पाहणी
धाराशिव तालुक्यातील ताकविकी येथे सकाळी आडेआठ वाजता, करजखेडा येथे पाहणी करणार आहे. तर लोहारा तालुक्यात मार्डी, लोहारा बु, मालेगाव, धानोरी, तावशीगड येथे शेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर वाशी तालुक्यातील वाशी, विरोजा, लोनखस येथे भेट दिल्यानंतर बीडच्या दिशेने जाणार आहेत.
चाऱ्याची स्थिती गंभीर
डिसेंबर महिन्यापर्यंत चारा पुरेल एवढाच शिल्लक असल्याचे चित्र शेतकरी वर्गाकडे दिसत आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती असणार आहे. विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. तर अनेक कूपनलिका बंद पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. तर काही गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पथकाकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाऊ शकते. यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात येऊन प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे, याची पाहणी करणार आहे.
केंद्रीय पथकासोबत कृषी विभागाची टीम असणार आहोत. लोहारा तालुक्यातील लोहारा बु. येथे तसेच वाशी तालुक्यातील वाशी येथे पथकाकडून शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी परिस्थिती पथकाच्या समोर मांडावी.
— रवींद्र माने, अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.