Drugdhamna News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Drugdhamna : मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, शेतमालाला मिळत नाही योग्‍य भाव

उत्पन्न कमी आणि उत्पादनाचा खर्च अधिक, अशी आर्थिक दरी वाढली. तर दुसरीकडे शेतमजुरीमध्ये दुप्पटीने वाढ होऊनही मजूर मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Drugdhamna : उत्पन्न कमी आणि उत्पादनाचा खर्च अधिक, अशी आर्थिक दरी वाढली. तर दुसरीकडे शेतमजुरीमध्ये दुप्पटीने वाढ होऊनही मजूर मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला शेतमजुरीच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे गणितही बिघडल्याचे दिसून येते.

गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालदार किंवा शेतमजूर ठेवावे लागतात. ते सहजासहजी मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही.

मात्र, वडिलोपार्जित व पिढ्या‌नपिढ्या शेती व्यवसाय सुरू असल्याने तो करताना सालगड्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी सालगड्यांची आतापासून मनधरणी करणे सुरू झाले आहे.

शेतमजुरांची मजुरी अचानक वाढल्याने स्थानिक शेतकरी चिंतेत व चिंतेत दिसत आहेत. वाढीव मजुरी देऊनही मजूर न मिळणे ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी शेतजमीन तयार करण्यात शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.

याआधी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही, त्यामुळे आता खरीप पिकांची तयारी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळेना

सध्या शासनाच्या विविध योजनांतर्गत गोरगरिबांना पुरेल एवढे अन्नधान्य कमी किमतीत मिळते. अनेक कुटुंबांनाही याचा फायदा होतो. ग्रामीण भागातील मजूरवर्ग कामाबद्दल गंभीर दिसत नाही. ते कामावर जाण्यासाठी मनमानी पद्धतीने वेतन देण्यास मागे हटत नाहीत.

पूर्वी शेतमजुरांना वस्तू विनिमय पद्धतीद्वारे अन्नधान्याच्या रूपात मजुरी दिली जात होती. मात्र शासनाच्या अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील अन्नधान्य अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे कामगारांनी धान्यासाठी काम करणे बंद केले. शेतातील कामासाठी अधिकच मजुरी देऊनही मजूर मिळत नाही. यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.

दीड लाखांवर गेली सालगड्याची मजुरी

रोजंदारीने येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. वर्षभर एका शेतकऱ्याकडे अडकून राहण्यापेक्षा रोजंदारीला मजूर वर्गाने जास्त पसंती दिली आहे. सालदारांचा तुटवडा असल्याने बाहेर तालुक्यातील व विशेषतः जंगल भागातील तांडे व वाड्यावरून लोक आणण्यात आली.

तिकडे जंगल भाग व भरकाडी शेती जास्त असल्याने तिथून कामावर येणाऱ्यांची संख्या जास्त होती. आता तेही सालाने राहायला तयार नाहीत.आजच्या स्थितीत सव्वा ते दीड लाख रुपये वार्षिक रकमेवर सालदार काम करीत आहेत. कुठे यापेक्षाही जास्त साल आहे. यंदा १० ते १५ टक्के पुन्हा वाढ मागत आहे.

परराज्यातील मजुरांची ना-ना

सध्या स्थितीमध्ये काटोल,नरखेड, कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यात संत्रा बागा असल्यामुळे त्यांना सालगड्याची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांना सालगडीच मिळणे मुश्कील झाले. शेवटी मध्यप्रदेशातून सालगडी आणण्याचे काम सुरू झाले. गेल्या काही वर्षांत ते गडीसुद्धा मिळणे बंद झाले. जे सालगडी येत आहे त्यांच्या मजुरीत २० टक्क्यांनी वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT