मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाच्या विविध विभागांच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल याची निश्चिती करावी, कुटुंबनिहाय तपशील या कार्यालयास सादर करावा.
औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात ८४० शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide In Aurangabad) केल्या आहेत. ‘उभारी २.०' उपक्रमातंर्गत (Ubhari) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या भविष्यातील नियोजनासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण लवकर करा. त्याचे परिपूर्ण अहवाल तात्काळ सादर करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी सर्व तहसिलदार व नायब तहसिदारांना दिले. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी गुरूवारी (ता.२०) जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे संवाद साधला. (EIght Hundred Farmers Committed Suicide Since Last Five Years In Aurangabad District)
यावेळी नायब तहसिलदार वैशाली डोंगरजाळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने दिलेल्या निकषांच्या आधारे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियास १ लाख रुपये सानुग्रह अनुदान शासनामार्फत देण्यात येते. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अनपेक्षित परिस्थितीत अडचणींचा सामना करावा लागतो. त्या कुटुंबांच्या गरजा आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारी २.० हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास भेट देवून त्यांच्या सामजिक व आर्थिक स्थिती विषयी माहिती संकलित करणे, विविध शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करणे आणि भविष्यातील नियोजनामध्ये काही नवीन उपाययोजनांचा समावेश करणे ही या उपक्रमांची प्रमुख उद्दिटे आहेत.
“उभारी २.०” चा वार्षिक आढावा घेवून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनास प्रस्ताव सादर करुन कार्यात्मक शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. यावेळी श्री.जाधवर यांनी जिल्ह्यातील २०१५ ते २२० या काळात ८४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यांची तहसिल कार्यालयात जमा झालेली सर्व विवरणपत्रातील माहिती संकेतस्थळावर ऑनलाईन भरावी. त्यानंतर या माहितीचे विश्लेषण करुन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाच्या विविध विभागांच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल याची निश्चिती करावी, कुटुंबनिहाय तपशील या कार्यालयास सादर करावा. हा परिपूर्ण सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लवकरच सादर करण्यात येतील. त्यामुळे या कुटुंबियांना लवकरात लवकर विविध योजनांचा लाभ देता येईल. त्यामुळे 'उभारी २.०' या उपक्रमाचे उद्दीष्टही साध्य करणे शक्य होईल असे सांगीतले.
२०१५ ते २०२० या कालावधीतील आत्महत्या
......
० पैठण - १५५
० सिल्लोड - १५४
० कन्नड - ११३
० फुलंब्री - १००
० औरंगाबाद - ७६
० वैजापूर - ६८
० गंगापूर - ६७
० सोयगाव - ६४
० खुलताबाद - ४२
० अपर तहसील कार्यालय औरंगाबाद - ०१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.