छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एका कुटूंबातील पाच जणांसह जवळपास ५० जण २७ जानेवारीपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करणार आहेत.
इतकेच नव्हे तर मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, गोडधोड खाणार नाही अशी शपथ घेतली आहे. जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याची माहिती आंदोलनकर्त्यांपैकी कलिम सलिम पटेल यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
यासंदर्भात कलीम पटेल म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठे एकवटले आहेत, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधव मुंबईकडे कूच करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी कलीम पटेल यांच्यासह खदिजा कलिम पटेल, हलीमा कलिम पटेल, निलोफर कलिम पटेल यांच्यासह जवळपास ५० जणांचा सहभाग असणार आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.