Electric-Bus sakal
छत्रपती संभाजीनगर

Electric Bus : संभाजीनगरमध्ये ई-बसच्या आगमनाचे ‘एप्रिल फुल’! प्रशासनाची ‘तारीख पे तारीख’

शहर बसच्या ताफ्यात ३५ ई-बसचा समावेश करण्यासाठी स्मार्ट सिटीने हैदराबाद येथील कंपनीसोबत करार केला आहे. वर्षभरापासून या ई-बसची प्रतीक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहर बसच्या ताफ्यात ३५ ई-बसचा समावेश करण्यासाठी स्मार्ट सिटीने हैदराबाद येथील कंपनीसोबत करार केला आहे. वर्षभरापासून या ई-बसची प्रतीक्षा आहे. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात १५ ई-बस शहरात दाखल होतील, असे सांगण्यात आले होते. पण, अद्याप चार्जिंगची सोय झालेली नसल्याने या बस थेट एप्रिल २०२४ मध्येच येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. पण, ही माहिती एप्रिल फुल ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानातून पहिला मोठा प्रकल्प शहर बसचा राबविण्यात आला. १०० बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. दरम्यान, शासनाने शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांचा वापर वाढविण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना केल्या.

शासनाच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत ३५ ई-शहर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या वातानुकूलित शहरातील पर्यटन मार्गासह ज्या मार्गावर अधिक गर्दी असते, तिथे चालविल्या जाणार आहेत. स्मार्ट सिटी या बस करारावर घेणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथील कंपनीसोबत करार करण्यात आला.

कंपनीने पहिल्या टप्प्यात १५ तर दुसऱ्या टप्प्यात २० बस देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बसची बांधणीही सुरू करण्यात आली. पण, ई-बसच्या चार्जिंगची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गतच जाधववाडी भागात स्मार्ट बस डेपोचे काम सुरू आहे. याठिकाणी सुमारे अडीचशे बस थांबण्याची सोय आहे, त्यातच ई-बसच्या चार्जिंगची सोय असेल.

ई-बस लवकरात लवकर आणता येईल, यासाठी चार्जिंगची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले जात आहे. बस डेपोच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर असले तरी पण परिसरात काळी माती असून, ही माती खोदून त्याठिकाणी कॉंक्रिटीकरणाच्या कामाला वेळ लागणार आहे. त्यामुळे ई-बसचे आगमन लांबणीवर पडणार असून, एप्रिलपर्यंत शहरात बस येतील, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या शंभर बसची तयारी

३५ ई-बस कंत्राटी पद्धतीने चालविल्या जाणार असल्या तरी पीएम ई-बस योजनेतून १०० बस देण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या बसच्या डेपोसाठी महापालिका शासनाकडे वाळूज येथील यापूर्वी एसटी महामंडळाला दिली जाणारी जागा मागणार आहे. जागा मिळाल्यानंतर शंभर बससाठी डेपो तयार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

Trending : 'असाच' मुलगा हवा! तरूणीने लग्नासाठी दिली जाहीरात; अजब अटीने उडाली सोशल मिडियावर खळबळ

Swanand Kirkire: कविता किंवा चाल सुचण्याची प्रक्रिया कशी असते? स्वानंद किरकिरेंची स्वास्थ्यमसाठी खास मुलाखत

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सने २३ जणांसाठी १०० कोटी खर्च केले, पण Rohit Sharma चा ओपनिंग पार्टनर कोण?

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानी समूहाच्या शेअर्स कोसळले

SCROLL FOR NEXT