छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध प्लायवुड व्यावसायिक कैलास चौधरी यांची पत्नी नमिता (वय ४०, रा. ज्ञानेश्वरनगर) यांनी गुरुवारी (ता.२१) पहाटे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, पती कैलास यांचे एका तरुणीसोबत असलेले अनैतिक संबंध माहिती पडल्याने नमिता यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी त्यांच्या माहेरकडील मंडळींनी दिलेल्या तक्रारी आधारे पती, सासू-सासरा, दीर आणि नणंद यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.
नमिता आणि कैलास यांचा १४ जुलै २००९ रोजी विवाह झाला होता. त्यांना १२ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे. नमिताला सासरच्या मंडळींकडून सुरवातीपासून त्रास होता, असा आरोप माहेरकडील मंडळींनी केला. तिच्या सासरकडील माहेरच्यांबद्दल बोलून अपमानित करायचे. दरम्यान, पती कैलासचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध जुळल्याचीही माहिती नमिताला कळाली.
सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास व दुसरीकडे पतीचे अनैतिक संबंध यामुळे कंटाळलेल्या नमिताने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली, असा आरोप तक्रारीत नमिता यांचे वडील गंगाधर रंगनाथ मनाठकर (वय ७२, रा. मनाठ, ता. हदगाव, जि. नांदेड) यांनी केला. त्या आधारे पती कैलास चौधरी, सासू मंगल चौधरी, सासरा विजय चौधरी, मोठा दीर विलास चौधरी (सर्व रा. ज्ञानेश्वरनगर), नणंद सविता कामाजी (रा. पुणे) आणि सुनीता मुरकेवार (रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
व्हॉट्सॲपवरील मेसेज कुणी डिलीट केले?
नमिता यांनी आत्महत्येपूर्वी गुरुवारी तिच्या बहिणीला व्हॉट्सॲपवर तीन मेसेज टाकले होते. मात्र, बहिणीने ते वाचण्यापूर्वीच डिलीट करण्यात आले. मात्र, हे मेसेज नमिता यांनीच डिलीट केले की, आणखी कुणी याचा तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.