घनसावंगी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे जून ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने अनुदान मंजूर केले होते. परंतु, वर्ष उलटून गेले तरीही अद्याप शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे हे अनुदान मिळावे, यासाठी शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे. ते निश्चित कधी मिळणार, हे माहित नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे चांगले हतबल झाले आहे.
घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने जून ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी कोरडवाहू पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ६०० प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी २७ हजार प्रति हेक्टर, फळपिकांच्या नुकसानीसाठी ३६ हजार प्रति हेक्टर असे एकूण तीन हेक्टरच्या मर्यादेत ही नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार आतापर्यंत ७९ हजार ८२८ बाधित शेतकऱ्यांची संख्या असून त्यापैकी ६६ हजार २४८ शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ६१ हजार ७११ शेतकऱ्यांना ६४ कोटी २५ लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित चार हजार ५३७ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारून अनुदान केव्हा जमा होणार, अशी विचारणा करीत आहे. परंतू हे काम ऑनलाईन पद्धतीने केले आहे. त्यामुळे ते खात्यावर जमा वरिष्ठ पातळीवरून होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनांच्या मदत व पुर्नवसन विभागांच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या. या मदतीचे अनुदान हे वरिष्ठ पातळीवरून आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे टप्याटप्याने हे अनुदान खात्यांवर जमा होण्याचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांचे आधारप्रमाणीकरण व केवायसी झाले नाही, त्यांनी केवायसी करून घ्यावे.
— अशिष पैठणकर,
पेशकार, तहसील कार्यालय, घनसावंगी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.