fir against bjp mla suresh dhas his wife prajakta brother devidas in beed hindu devasthan land scam case  
छत्रपती संभाजीनगर

देवस्थान जमीन प्रकरण : भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी, भावावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

बीड : बनावट कागदपत्रांच्या अधारे देवस्थानची जमिन स्वत: व इतरांच्या नावे करुन घेऊन फसवणूक केल्यासह स्वत: व इतरांच्या नावे कोट्यावधी रुपयांची बेकायदेशिर मालमत्ता मिळविल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी (ता. २९) रात्री आष्टी पोलिस ठाण्यात फसवणूकीसह इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस, भाऊ देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान व इतरांची नावे आहेत. राम खाडे यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा नोंद होत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

खंडपीठाने तक्रारच फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश ता. १८ ऑक्टोबरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. मात्र, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद करण्यासाठी महसूलची परवानगी मागीतली होती. दरम्यान, सुरेश धस यांनी आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा दावा करुन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने श्री. धस यांची याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

यानंतर मंगळवारी रात्री राम खाडे यांच्या तक्रारीवरुन ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०, (ब.), १०९ भारतीय दंड विधान संहिता १८६० अन्वये गुन्हा नोंद झाला. यामध्ये भाजपचे लातूर - बीड - उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांच्यासह नातेवाईकांची संशयित आरोपींमध्ये नावे आहेत.

तक्रारीवरुन नोंदलेल्या फिर्यादीत गंभीर आरोप

राम खाडे यांनी दिलेल्या मुळ तक्रारीत गंभीर आरोप आहेत. हीच तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याखाली फिर्यादीच्या माध्यमातून नोंदविली गेली. आमदार सुरेश धस यांच्या संपत्तीत त्यांनी महसूलचे राज्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर देवस्थान ट्रस्ट ताब्यात घेवुन देवस्थान व शासनाच्या मालमत्तेचा गैरमार्गाने व पदाचा गैरवापर करुन करुन कोटयावधी रुपयांची उलाढाल बोगस कंपन्या व कार्यकर्त्याचे नावे दाखवुन आर्थिक लुट केल्याचे म्हटले आहे.

राजकारणात ते स्वत:ला ‘डॉन’ म्हणुन घेतात, वाळु माफिया, धान्य माफिया, जंगल माफियां व दोन नंबर धंदेवाल्यांची पाठराखण करतात व असेच लोक त्यांचे कार्यकर्ते आहेत. मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टवर आष्टी विधानसभा सदस्य पदसिध्द सदस्य असल्याचा फायदा घेत देवस्थान पुजाऱ्याला हाटवून कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन त्यांनी नवीन ट्रस्टी तयार करुन देवस्थान ताब्यात घेतल्याचाही आरोप या तक्रारीत आहे. या ट्रस्टच्या चेंज रिपोर्टवर हरकत असताना त्यांनी राज्यमंत्री असतांना दबाव टाकुन चेज रिपोर्ट मंजुर करुन घेतला.

त्यावेळी भिमराव धोंडे आमदार असल्याने ते ट्रस्टचे पदसिध्द सदस्य असतांनाही त्यांना एकही बैठकीला बोलविले नाही. देवस्थानच्या बांधकामासाठी भाविकांकडूनन गोळा केलेल्या लोकवर्गणीचा हिशोब नाही. ट्रस्टच्या माध्यमातुन तलाव बांधणे, गाळ काढणे, झाडे लावणे, गोशाळा चालविणे, गाळे बांधणे, भाडे वसुल करणे, या बाबत प्रचंड अनियमीतता असुन एकाच कामावर शासनाने व ट्रस्टने खर्च केल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोपही आहे.

ट्रस्टच्या कोविड सेंटरमध्येही अनियमितता झाली आहे. तर पिंपळेश्वर देवस्थानचे आमदार सुरेश धस अध्यक्ष असुन देवस्थानची जमीन व मालमत्ता त्यांच्या ताब्यात आहे. मंदीर परिसरातील तलावाचे पाणी शेतीसाठी वापरले असून देवस्थानाच्या जागेत अनिशा ग्लोबल इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलची इमारत उभी आहे. त्याच्या भाड्याचे व जागेशेजारी पिंपळेश्वर कॉलनीच्या नावानेभव्य प्लॉटींग खेरदी विक्री सुरु करुन नंतर कॉलनीचे नाव सावळेश्वर कॉलनी करण्यात आले. आष्टी शहराचा विकास आराखडा मंजुर नसतांना या जागेत एन.ए. प्लॉटच्या लेआऊटला कोणी मंजुरी दिली, असा सवाल करण्यात आला. विठोबा देवस्थानवर त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस ट्रस्टी असून या ट्रस्टवर देवस्थान जमीन बोगस खालसा आदेश प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनोज रत्नपारखी यांचे कुटूंबातील सदस्य आहेत.

मच्छिंद्रनाथ ओव्हरसिज प्रायव्हेट लिमिटेड, जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रिज या कंपनीच्या संचालक प्राजक्ता धस यांनी तसेच जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज तर्फे संचालक प्राजक्ता धस यांनी स्वतःच्या व इतर नातेवाईकांच्या नावे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुंबई शाखेचे २७ कोटी रुपये कर्ज घेताना गहाणखत केलेल्या

शेतीउताऱ्यांवर तलाठ्याच्या स्वाक्षऱ्या नाहीत. बँकेने सुरेश धस यांचे हमी घेण्याची लिखीत असतांना ते कायदेशीर सल्लागाराने तपासले नाही व अभिप्राय दिलेला नाही. यामध्ये राशिन (जि. अहमदनगर) येथील सर्वे मालमत्ता प्राजक्ता धस व शशीकांत बबन पासलकर यांचे सामाईक असुन त्यांचे नावावर पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे शाखेचे चार कोटी १० लाख रुपयांचे कर्ज आहे. महसूल राज्यमंत्री असताना विधवा महिलेच्या जमीनीवर अतिक्रमन करून प्रत्यक्ष जागेची मोजणी न करता राजकीय दबाव तंत्राचा वापर करुन एन.ए. लेआऊट मंजुर करुन प्लॉट विक्री केल्याचा आरोपही केला आहे.

सुरेश धस यांच्या ताब्यात असलेल्या आषटी दुध संघ व कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचाही रवापर करुन अर्थिक उलाढाल स्वतःच्या फायद्यासाठी केली. आष्टी येथील खरेदी - विक्री संघाची मुख्य रस्त्यावरील जागा आष्टी दुध संघाच्या नावावर घेवून त्यांचे रुपांतर खाजगी मालकीत केले. कोट्यावधी रुपयांची जागा केवळ 30 लाख रुपयांना घेतलेली होती.

कार्यकर्त्यांना व घरातील कुटुंबियांना पुढे करुन त्यांनी भुमाफियांच्या सहाय्याने कोट्यावधी रुपये कमविण्याचा धंदा सुरु करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांची जंगम मालमत्ता व स्थावर मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही या तक्रारवजा फिर्यादीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT