औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पहिलीपासून शाळा सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला. १५ एप्रिलपर्यंत शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीत पूर्णवेळ शाळा भरून अध्ययनक्षती भरून काढावी, त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतचा प्रत्यक्ष शिक्षणाचा सूक्ष्म कृती आराखडा शाळांना शिक्षण विभाग व डायटकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत ३० एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शिकवण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले आहे. दरवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातात. त्यानंतर पुढील २० ते २५ दिवस निकालाची प्रक्रिया सुरु असते. त्यासाठी दरवर्षी मार्चअखेर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होऊन पुढील २० दिवस निकालाची प्रक्रिया सुरू असते. यंदा मात्र कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शिक्षण व त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला आहे.
शिक्षकांची हवी शंभर टक्के उपस्थिती
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सर्व शाळात शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती असावी. तसेच पूर्णवेळ शाळा भरतात की नाही, याची पडताळणी करावी. सूचना न पाळणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना झालेल्या बैठकीत दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.