कुणाल काळे 
छत्रपती संभाजीनगर

काळजाच्या तुकड्याला वाचवण्यात आईवडिलांना अपयश, कुणाल गेला

सुभाष होळकर

शेतात काम करीत असलेले गजानन काळे यांनी गंभीर अवस्थेतील कुणालला खांद्यावर ऊचलून आपल्या वाहनात बसविले व क्षणाचा ही विलंब न करता ते अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने भरधाव निघाले.

शिवना (जि.औरंगाबाद) : रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे गंभीर रुगणांना दवाखान्यात नेण्यास उशीर होत असल्याने, मादनी ते खुपटा (ता.सिल्लोड) Sillod या रस्त्याने आठवडाभरात दुसरा बळी घेतला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वर्ष २००९- १० मध्ये तयार झालेल्या या रस्त्याची पहिल्याच पावसात दाणादान उडाली. अवघे साडेपाच किलोमीटर अंतर कापण्यास तब्बल पाऊण तास वेळ लागल्याने आठवडाभरापूर्वी एक गरोदर माता रस्त्यातच प्रसूत झाली. मात्र वेळेवर उपचाराअभावी तिला आपल्या बाळास मुकावे लागले. ही घटना ताजी असतानाच खुपटा Khupta (ता. सिल्लोड) येथील सर्पदंश झालेल्या पाच वर्षीय बालकाला उपचारासाठी वेळेत पोहोचता न आल्याने आपला जीव गमवावा लागला. खुपटा येथील कुणाल कृष्णा काळे (वय ५ ) याला मंगळवारी (ता. सहा) सर्पदंश झाला. आईवडिलांसोबत कुणाल शेतात गेला होता. तिथे खेळत असताना कुणालला सापाने चावा घेतला. त्याला रडताना बघून त्याच्या आईने तात्काळ धाव घेतली.five years old boy died due to late treatment in sillod tahsil

मात्र आईच्या डोळ्यासमोरच सापाने पुन्हा एकदा कुणालला दंश केला. शेतात काम करीत असलेले गजानन काळे यांनी गंभीर अवस्थेतील कुणालला खांद्यावर ऊचलून आपल्या वाहनात बसविले व क्षणाचा ही विलंब न करता ते अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने भरधाव निघाले. मात्र रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे खुपटा ते जळकी फाटा हे साडेपाच किलोमीटर अंतर कापायलाच त्यांना पाऊण तास लागला. तेथून अजिंठा- बुलडाणा राज्यमार्गावर लागल्यानंतर शिवना गावानजीक कुणालची प्राणज्योत मालवली. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या कुणालच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काम लवकरच सुरु

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे Public Works Department उपअभियंता कल्याण भोसले म्हणाले कि, या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली असून काम लवकरात-लवकर सुरु करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT