Aakashwani Chowk sakal
छत्रपती संभाजीनगर

Aakashwani Chowk : सदोष रचनेने वारंवार अपघात; आकाशवाणी परिसरात आतापर्यंत २० नागरिकांचे बळी

जालना रस्त्यावरील आकाशवाणी चौक पूर्वीपासून मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. चौकाची सदोष रचना असल्याने आतापर्यंत येथे २० बळी गेले.

सकाळ वृत्तसेवा

- विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर - जालना रस्त्यावरील आकाशवाणी चौक पूर्वीपासून मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. चौकाची सदोष रचना असल्याने आतापर्यंत येथे २० बळी गेले. याला केवळ पोलिसांनाच दोषी ठरवून चालणार नाही. पोलिसांसोबत असलेले महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खातेही याला तितकेच जबाबदार आहे.

हा चौक खुला करावा, यासाठी जवाहरनगर कॉलनी कृती समितीचा लढा कायम आहे. मात्र, यामध्ये कोण पुढाकार घेणार हा प्रश्न आहे. वाहतूक विभागाला आहे त्या स्थितीत आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. अजून किती बळी घेतल्यावर या चौकाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे, हा संतप्त सवाल येथील कृती समितीच्या माध्यमातून नागरिकांनी उपस्थित केला.

नेमके चुकले कुठे?

शहरातील जुन्या रचनेप्रमाणे आकाशवाणी चौकाची रचना आजही कायम आहे. गेली काही वर्षांत शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, आकाशवाणी चौकाची वाहतुकीची समस्या अद्यापही कायम आहे. या चौकाची रचनाच मुळात सदोष आहे. मोंढा नाका ते सेव्हनहिल असा येण्या-जाण्याचा मार्ग आहे.

चौकातून अजून एक रस्ता जवाहर कॉलनीकडे जातो. दुसरा एक निमुळता रस्ता महेशनगरकडे जातो. यामुळे महेशनगरकडून येणारे वाहनधारक थेट जालना रस्त्यावर दाखल होतात. मोंढा नाक्याकडून येणाऱ्या वाहनधारकांसाठी ही बाब अडचणीची ठरते.

आले पोलिसांच्या मना...

आकाशवाणी चौकाच्या वाहतुकीच्या सुधारणेबाबत अनेक प्रयोग विविध पोलिस आयुक्तांनी राबवून पाहिले. मात्र, त्यात सुधारणा झाली नसल्याने हे प्रयोग फसले. वर्ष २०२१ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी हा चौक दिवसा वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्याचे ठरवले आणि त्याची अंमलबजावणी केली.

यामुळे दिवसा या चौकात सिग्नलच्या दुभाजकामध्ये बॅरिकेड टाकून जवाहर कॉलनीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येते. मात्र, या पोलिसांच्या धोरणामुळे वाहतुकीला अडचण आणि अपघाताची संख्या वाढल्याचा दावा कृती समितीने केला.

बेशिस्त वाहनधारक

या चौकात वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने बेशिस्त वाहनधारकांना वाहतुकीसाठी हा चौक पर्वणीचा वाटत आहे. दिवसा चौकात सिग्नल सुरू असला आणि समोर पोलिस कर्मचारी उभा असला तरी वाहनधारक न जुमानता वाहतूक करीत असल्याचे चित्र असते. दिवसा वाहतूक कर्मचारी चौकात दिसून येतात.

रात्री नऊनंतर चौकातील बॅरिकेड काढून चौक वाहतुकीसाठी मोकळा सोडून पोलिस निघून जातात. यामुळे रात्रीच्या सुमारास येथील वाहतूक सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येते. गेली महिन्याभरात या चौकात रात्रीच्या वेळी घडलेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागल्याची घटना याचे उदाहरण आहे.

हे ठरू शकतात उपाय

  • चौकातील सिग्नलमध्ये असलेले दुभाजकातील अंतर दोन्ही बाजूने वाढवणे.

  • लेफ्ट टर्न वाहतुकीसाठी मोकळा करणे, जेणेकरून महेशनगरकडे जाणाऱ्या वाहनांना सोयीचे होईल.

  • स्पीड ब्रेकरसाठी फलक लावणे. रेडियम पट्टी लावणे.

  • चौक खुला करून वाहतूक नियमनासाठी पाच कर्मचारी नियुक्त करणे.

  • मोंढा नाका, सेव्हनहिल हे उड्डाणपुलाखालील सिग्नल बंद करून, अमरप्रीत चौक, आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी खुला करणे.

आकाशवाणी चौक हा शहरातील कळीचा मुद्दा ठरत आहे. येथे सातत्याने प्राणांतिक अपघात होत आहेत. आम्ही पोटतिडकीने हा चौक वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी लढत आहोत. मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने बघत नाही. यावर प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता तरी बळी घेणे थांबवा असे म्हणावे वाटत आहे.

- नंदू गवळी, अध्यक्ष, जवाहर कॉलनी नागरिक कृती समिती.

अपघातात जी व्यक्ती जिवानिशी जाते फक्त त्यांच्या घरातील सदस्यांना त्याची जाणीव असते. तीन वर्षांत २० बळी गेल्यानंतरही हे प्रशासन ढिम्म आहे. पोलिस आणि या चौकाशी संबंधित सर्वच शासकीय विभागांनी यावर एकत्र येत उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील महत्त्वाचा असा हा चौक आहे. चौक खुला करावा म्हणून लढा सुरू असला तरी प्रशासन याची दखल कधी घेणार हा प्रश्न आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर या चौकात यापुढेही वारंवार अपघात घडतील, हे निश्चित. त्यामुळे हे प्रकरण पोलिस, महापालिका यांनी संवेदनशीलरीत्या हाताळावे

- गोपाल पंढरे, रा. विष्णुनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT