Gas Cylinder Blast sakal
छत्रपती संभाजीनगर

Cylinder Blast : घरात सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - किराडपुरा परिसरातील शरीफ कॉलनी भागात एका घरामध्ये शुक्रवारी (ता. तीन) रात्री साडेआठच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात सदफ इरफान शेख (वय तीन) ही चिमुकली जागीच ठार झाली, तर तिच्या कुटुंबातील इतर पाच जण भाजले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शरीफ कॉलनीतील रोशन मशिदीजवळ इरफान शेख यांचे पत्र्याचे दोन खोल्यांचे घर आहे. शेख यांचा भंगारचा व्यवसाय आहे. या घरात इरफान शेख आणि त्यांचे दोन भाऊ राहतात. शुक्रवारी सायंकाळी घरात शेख रिजवानसह सात सदस्य होते. रात्री साडेआठला शेख यांच्या घरातून अचानक शेजाऱ्यांना मोठा आवाज आला. शेख यांच्या घरात त्यावेळी लहान मुलांसह रिझवान खान सत्तार खान होते.

आवाज आल्यानंतर शेजारी शेख यांच्या घराकडे धावले. यावेळी घरातून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसले. काही वेळातच घरातील भंगार सामानानेही पेट घेतला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. नागरिकांनी तातडीने आपापल्या घरातून पाणी आणत मदतकार्य केले. आजूबाजूच्या घरांतून पाणी; तसेच तेथील एका इमारतीच्या बांधकामाच्या वाळूचा वापर करीत नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल ४५ मिनिटे ही आग धगधगत होती.

या घटनेत सदफ ही चिमुकली ठार झाली, तर झिशान शेख (वय ९), रिझवान खान सत्तार खान (वय ४०), रेहान चाँद शेख (वय १७), फैजान रिझवान पठाण (वय १३), आदिल खान इरफान खान (वय १०) हे जखमी झाले आहेत. झिशान ४० टक्के, रिझवान हे २० टक्के, रेहान १० टक्के तर फैजान आणि आदिल १ टक्का भाजलेला आहे, अशी माहिती घाटीतील वैद्यकीय सूत्रांनी दिली.

शेख यांचे घर ज्या ठिकाणी आहे, तो भाग एका अत्यंत चिंचोळ्या गल्लीत आहे. स्फोट झालेल्या घराकडे जाण्यासाठी पाच फुटांचा रस्ता आहे. आग लागल्यानंतर नागरिकांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमनचे बंब एक तास उशिरा आल्याचा आरोप नागरिकांनी केला. घटनास्थळापर्यंत बंब जाणे शक्य नसल्याने जवानांनी बंबाचा पाइप त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा पाइपही अपुरा पडला. दाट लोकवस्तीचा भाग असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळेसुद्धा बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले.

दोन तास वीजपुरवठा खंडित

आगीमुळे महावितरणची केबल वायर जळाली. त्यामुळे दोन तास या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

किराडपुऱ्यात साडेआठला सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला बोलावण्यात आले. आग लागली त्यावेळी घरात नेमके किती सदस्य होते, याची माहिती घेणे सुरू आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके कारण समजू शकेल.

- नवनीत कॉवत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २

दोघा भावंडांनी वाचवले जखमींचे प्राण

मोहंमद निसार आणि मोहंमद खिजर या शेजाऱ्यांनी स्फोट होताच मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता घरातील जखमींना बाहेर काढले. आग लागताच संपूर्ण भागातील विद्युतपुरवठा बंद झाला होता. परंतु, अंधारतही या भावंडांनी इतरांचे जीव वाचविण्यासाठी मदत केली. ते म्हणाले, ‘‘आग मोठी होती. परंतु, आम्ही गेलो नसतो, तर सगळ्यांचाच मृत्यू झाला असता. शेवटी आम्ही शेजारधर्म पाळला. आमच्यामुळे जीव वाचले. पण, एका चिमुकलीचा जीव गेला याचे वाईट वाटते.’’

आगीच्या कारणाचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सिलिंडरचा स्फोट कसा झाला, याचा तपास पथकाकडून सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT