Gas Cylinder Blast sakal
छत्रपती संभाजीनगर

Gas Cylinder Blast : हलाखीत जगणाऱ्या संसाराची राखरांगोळी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहरातील किराडपुरा येथील शरीफ कॉलनीतील हलाखीत जगणाऱ्या शेख कुटुंबीयांच्या घराची गॅस सिलिंडरच्या स्फोटात राखरांगोळी झाली. हाताला मिळेल ते काम करून हे कुटुंबीय संसाराचा गाडा हाकते. आता त्यांच्यावर आभाळच कोसळले आहे.

दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अरूंद गल्लीतील सर्वच नागरिक मदतीला धावले. जो-तो आपल्या घरातून पाणी आणून टाकत होता. पण, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती.

शहरात अगोदरच ८ ते १० दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंब आपल्या घरात पाणी साठवून ठेवते. पण, आगीची ही घटना घडता गल्लीतील सगळेच आपआपल्या घरातील पाणी घेऊन आले. त्यांनी जमेल तसा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण गल्लीतील लोकांनी घरातील पाणी आगीवर टाकले. घरात पिण्यासाठीही पाणी शिल्लक ठेवले नाही. आठ-दहा दिवस नळ येत नाहीत. जे काही पाणी साठवून ठेवले होते ते सर्व आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी वापरले. त्यामुळे या दुर्घटनेत माणुसकी दिसून आली.

स्फोटानंतर शेजारील घराच्या भिंतीला हात लावल्यानंतर चटके लागत होते. शेजारी राहणारे एवढे घाबरले होते की नेमके काय झाले त्यांनाच कळाले नव्हते. आगीमुळे सर्व विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दोन तासानंतर पुन्हा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.

पुढे जायचो अन् माघारी फिरायचो

मदत करणारे मोहंमद निसार आणि मोहंमद खिजर यांनी सांगितले, ‘‘गॅस सिलिंडरचा स्फोट होताच जोरात आवाज आला. त्यामुळे शेजारी राहणार लोक हादरून गेले. स्फोट होताच घरातील काही मंडळी बाहेर पडली. ६०० स्केअर फुटांचे पत्र्याचे घर होते. दोन्ही बाजूंनी घरातील मंडळी बाहेर पळाली. आग आग आटोक्यात आणण्यासाठी शेजारी धावले. परंतु, आग एवढी भयानक होती की पुन्हा माघारी फिरावे लागत होते.’’

परिस्थिती हलाखीची

इरफान शेख, रिजवान शेख, सलमान शेख, आमेर शेख या चारही भावंडांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे. हाताला जे काम मिळेल ते काम ते करतात. तिघे भावंडे आपल्या कुटुंबीयासोबत ६०० स्केअर फुटांच्या घरात राहत होते. एक भाऊ शेजारी भाड्याच्या घरात राहत होता.

अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमनची दमछाक

अडीत ते तीन फुटांची गल्ली मुख्य रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर आत असलेल्या घरात स्फोट झाल्याने अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणताना मोठे पाइप जोडावे लागले. परंतु, तेही पाइप पुरत नव्हते. वीज खांबांवरील तारा, अरुंद रस्ते, बघ्यांची गर्दी यामुळे अग्निशमन विभागाची दमछाक झाली. ही सर्व जुळवाजुळव करीत असताना अख्खे घर जळून खाक झाले होते.

महिनाभरापूर्वी याच तारखेला छावणीत घडले होते अग्नितांडव

महिनापूर्वी (ता. ३ एप्रिल) छावणीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. त्याला एक महिना पूर्ण होत असतानाच किराडपुऱ्यात ही घटना घडली. इलेक्ट्रिक स्कूटी चार्जिंगला लावून टेलर कुटुंबीय झोपले होते.

पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे इमारतीला भीषण आग लागली होती. यात दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबीयातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान, तिसऱ्या मजल्यावरील भाडेकरू पती-पत्नींनी शेजारील टेरेसवर उड्या मारून जीव वाचविला होता. ही घटना छावणी परिसरातील दाना बाजार जैन मंदिराशेजारी घडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT