sambhaji nagar  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : गरिबांच्या ‘घरकुला’त पुन्हा आडकाठी ; योजनेची पायाभरणीच होईना तर घरभरणी कधी होणार

महापालिकेने वर्षभरापूर्वी शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे योजनेची पायाभरणीच होईना तर घरभरणी कधी होणार, असा प्रश्न घरकुलांसाठी इच्छुक विचारत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात सुमारे ११ हजार घरे बांधली जाणार आहेत. मात्र, यातील तीसगाव व सुंदरवाडी येथील जागा सिडको विकास प्राधिकरण असलेल्या भागात आहेत. त्यामुळे याठिकाणी म्हणजेच संबंधित जागेपुरते नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेला परवानगी मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेने वर्षभरापूर्वी शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे योजनेची पायाभरणीच होईना तर घरभरणी कधी होणार, असा प्रश्न घरकुलांसाठी इच्छुक विचारत आहेत.

पंतप्रधान आवास योजनेचे काम शहरात अनेक वादानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यात आता नियोजन प्राधिकरणाची अडचण समोर आली आहे. महापालिकेने आवास योजनेसाठी महसूल विभागाने सुंदरवाडी, हर्सूल, तिसगाव येथे जागा दिल्या आहेत. यातील हर्सूल येथील जागेवर छोटेसे अतिक्रमण वगळता इतर अडचणी नाहीत. मात्र तिसगाव, सुंदरवाडी येथे नियोजन प्राधिकरण सिडको आहे.

त्यामुळे महापालिका याठिकाणी बांधकाम परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळे या जागेपुरते नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेला अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला पाठविला आहे. पण, त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाकडून नियोजन प्राधिकरणाचा अडथळा दूर झाल्यानंतर कंत्राटदारांना महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून बांधकाम परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी आणखी चार ते पाच महिने लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफवांमुळे फोनाफोनी

आता २० जानेवारीपासून महापालिका चॉईस फॉर्म भरून घेणार आहे. त्यासाठी पाच हजार रुपये घेतले जात आहेत, अशी अफवा पसरविली जात आहे. त्यामुळे नागरिक फोन करून महापालिकेकडे विचारणा करत आहेत. मात्र अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया सध्या सुरू नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नियोजन प्राधिकरणासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला आहे. असे असले तरी योजनेच्या कामासाठी संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

— अपर्णा थेटे, उपायुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT