Ghati Hospital  sakal
छत्रपती संभाजीनगर

Ghati Hospital : रुग्ण २५० अन् खाटा २२ ; घाटीच्या अपघात विभागातील धक्कादायक स्थिती

संपूर्ण मराठवाड्याचा आधार म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (घाटी) पाहिले जाते. घाटीतील अपघात विभागात दररोज सुमारे अडीचशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होते.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण मराठवाड्याचा आधार म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (घाटी) पाहिले जाते. घाटीतील अपघात विभागात दररोज सुमारे अडीचशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होते. असे असताना अद्यापही घाटीचा अपघात विभाग केवळ २२ खाटांचाच आहे. विशेष म्हणजे, जागादेखील कमी असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यास डॉक्टर आणि परिचारिकांना रुग्णांवर उपचार करताना अडचणी येतात.

घाटी रुग्णालयाला १ हजार १७७ खाटा मंजूर आहेत. बाह्यरुग्ण विभागातदेखील दररोज दोन हजार रुग्ण येतात. बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यानंतर किंवा तत्काळ उपचाराची गरज पडणारे रुग्ण अपघात विभागात येतात. विभागात दररोज अडीचशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होते. घाटीचा २२ खाटांचा अपघात विभाग हा दोन भागांत विभागलेला आहे. याचे मेडिसीन आणि सर्जरी असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. मेडिसीनमध्ये छातीत दुखणे, विषबाधा अशी तत्काळ उपचाराची गरज असणारे विविध आजारांचे रुग्ण उपचार घेतात. दुसरीकडे सर्जरी विभागात मारहाण, अपघातातील जखमी, स्वतः दुचाकीवरून पडणारे रुग्ण उपचार घेतात. यातील गरज असणाऱ्यांना प्राथमिक उपचार करून नंतर वॉर्डात दाखल करण्यात येते.

हाणामारीतील ३० अन् अपघातातील ३४ रुग्ण

अपघातात विभागातील सर्जरी विभागात सोमवारी (ता. १८) चोवीस तासांमध्ये तब्बल ११६ रुग्णांची नोंद झाली होती. यात अपघातात जखमी झालेले ३४ तर हाणामारीतील ३० जखमींची नोंद झाली होती. एवढेच रुग्ण मेडिसीन विभागातदेखील येतात.

डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

एका दिवसात हाणामारीतील आणि अपघातातील गंभीर जखमी असे किमान ३० रुग्ण दररोज येथे येतात. अनेकवेळा मोठी गर्दी होऊन दोन गट थेट विभागातच आपसात भिडण्याचे प्रकारही घडले आहेत. यात डॉक्टर, परिचारिकांनादेखील मार लागल्याच्या घटनांची नोंद आहे.

सध्या अपघात विभागात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यात अद्याप प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही. अपघात विभागातील खाटा वाढविण्याचा विचार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. बाजूच्या मोकळ्या जागेत सोयी-सुविधा उपलब्ध करून आणखी १५ ते २० खाटा वाढविण्याचे नियोजन आहे.

— डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT