लसीकरण sakal media
छत्रपती संभाजीनगर

लसीकरणाची गरज शासनालाच?; दुसऱ्यासह बुस्टर डोसला नकारघंटा कायम

दुसऱ्यासह बुस्टर डोसला नकारघंटा कायम, आतापर्यंत ८१ टक्के लसीकरण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज केवळ शासनाला असल्याचे विदारक चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना नागरिकांकडून दुसऱ्या डोसासह बुस्टर डोस घेण्यास नकार घंटा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाला घरोघरी जाऊन लस घ्या, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटांनी थैमान घातले आहे. यात कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव गेला. तर दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या ही अपुरी पडत होत्या. शिवाय दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रासमोर रांगा लागल्या होत्या. त्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठाही कमी होत होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. परंतु, दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यासह ऑक्सिजनची गरज भासली नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली आणि कमी ही झाली.

दरम्यान जिल्ह्यात आजघडीला १८ वर्षांपुढील १३ लाख ४१ हजार ७१३ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ८१ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, दुसरा डोस घेताना अनेकांची नकारघंटा कायम असल्याचे चित्र असून आतापर्यंत नऊ लाख ४६ हजार २१० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे चित्र आहे. शिवाय आतापर्यंत केवळ ११ हजार ४३२ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा बुस्टर डोस घेतला आहे. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यात नागरिकांकडून मोफत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसासह बुस्टर डोसकडे काणाडोळा केला जात असल्याचे विदारक चित्र आहे. परिणामी लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असताना ही नागरिक येत नसल्याने ते ओस पडले आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरणाची गरज केवळ शासनाला असल्याचा भास होत असून नागरिकांनी ही स्वतःच्या सुरक्षेसाठी शासनाकडून मोफत दिली जात असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसऱ्या डोसासह बुस्टर डोस घेणे ही आज काळाची गरज आहे.

अनेक जण स्थलांतरित

राज्यशासनाकडून १८ वयोगटा पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला १६ लाख ५० हजार ४०० जणांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे.

त्यापैकी एक लाख ते सव्वा लाख नागरिकांचे स्थलांतर झाल्याचे आरोग्य विभागाच्या पडताळणी पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिल्या डोसची टक्केवारी काही प्रमाणात कमी असल्याचे दिसून येत आहे, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.

१५ ते १७ वयोगटातील लसीकरण वेगाने

जिल्ह्यात १५ ते १७ वयोगटातील लसीकरण मागील दीड महिन्यांपासून वेगाने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६८ हजार २८४ जणांना पहिला तर २० हजार २९० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT