dharashiv sakal
छत्रपती संभाजीनगर

Dharashiv News : पेरण्यांवर केलेला खर्च पाण्यात गेला हो...

शेतकऱ्यांनी मांडल्या केंद्रीय पथकासमोर व्यथा

सकाळ वृत्तसेवा

लोहारा : मागील दहा-बारा वर्षांपासून निसर्ग साथ देत नाही. यंदा तर पाऊस नाही, पाणी नाही, जनावरांना चारा नाही. पेरण्यांवर केलेला खर्च वाया गेलाय. आमच्या डोक्यावर अडचणींचा मोठा डोंगर आहे साहेब... सरकारनं काहीही दिलं नाही... आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं..,’ अशा व्यथा दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या.

लोहारा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. १३) केंद्रीय ग्रामीण विकास सहायक आयुक्त मोती राम, मध्य भारत अवर सचिव मनोज कुमार, निती आयोगाचे संशोधन अधिकारी मीना शिवचरण यांचा समावेश असलेले केंद्रीय पथक आले होते. सकाळी दहाच्या सुमारास दौऱ्याला सुरुवात झाली. मार्डी येथील शेतकरी देवराव कोकरे यांच्या शेतात जावून पहाणी केली. त्यानंतर केंद्रीय पथकाने लोहारा शिवारातील विरेश स्वामी यांच्या शेतातील पेरूच्या बागेला भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

विरेश स्वामी या तरूणाने नोकरीच्या मागे न लागता आहे त्या तीन-चार एकर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून उपजिवीका भागवावे, या आशेने गत वर्षी सव्वा एकरावर पेरूची बाग केली. यामध्ये १२५ पेरूची झाडे लावली. झाडांना फळधारणा सुरू झाली. मात्र, पाऊस नसल्याने बाग आता जळून जाण्याच्या मार्गावर आहे. दोन एकरामध्ये सोयाबीन व तुरीचे पीक पट्टा पद्धतीने घेतले. परंतु, पावसाअभावी सर्वकाही नाहीसे झाले.

उसनवारी करून लाखो रुपये खर्च केले. पण पदरात एक दमडीही पडली नाही. कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवणे अवघड झाले आहे. त्यात हात उसणे घेतलेले पैसे परत कसे करायचे, साहेब तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, अशी व्यथा या शेतकऱ्यांनी मांडली.

जळालेले आणि सुकलेले पेरूची झाडे पाहून दुष्काळाची तीव्रता केंद्रीय पथकाच्या लक्षात आली. यावेळी जगन्नाथ पाटील, अयनोद्दीन सवार, महेबूब गवंडी या शेतकऱ्यांनी तालुक्यात ७५ टक्के रब्बीची पेरणी झाली नाही. पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. दुष्काळी उपाययोजना करून शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा देण्याचा आग्रह पथकांसमोर धरला. त्यानंतर पथकाने माळेगाव, धानुरी, तावशीगड या गावांच्या शिवारात जावून पाहणी केली.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, विभागीय कृषी अधीक्षक महेश तीर्थकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी, कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी तरळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT