औरंगाबाद : लॉकडाउनमुळे सलून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली. तब्बल दोन महिन्यांपासून केस कापले नसल्यामुळे व दाढी केली नसल्याने अनेक जण ओळखायला येत नसल्याचे चित्र आहे. त्यावर सोशल मीडियावर अनेक विनोदही झाले. आता शासनाने लॉकडाउनमधून शिथिलता देत आहेत. त्यामुळे सलून, ब्युटीपार्लर सुरू करण्यास परवानगी दिली जाईल का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरी शासनाने परवानगी दिली तरी शासन काही अटी टाकू शकते. त्या अटी पाळाव्याच लागतील. शिवाय सलून सुरू होणार आहेत, असे मेसेजही व्हायरल होत आहेत. जेव्हा केव्हा निर्णय होईल तेव्हा अटी शर्ती असणारच आहेत.
कोरोना विषाणूमुळे दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यात काही काळासाठी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास मुभा असली मात्र इतर आस्थापना बंद आहेत. विशेषतः सलून बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाउनचा चौथ्या टप्पा काही प्रमाणात शिथिल केला आहे. त्यानंतर आता सलून व ब्यूटीपार्लर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी काही जिल्ह्यांमधून होत आहे. सलून बंद असल्याने या व्यवसायावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष शासनाच्या आदेशाकडे लागले आहेत.
जरी परवानगी दिली तरी या असतील अटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.