Harsul Lake  sakal
छत्रपती संभाजीनगर

Harsul Lake : हर्सूल तलाव होणार ओव्हरफ्लो; पाणी पातळी २६ फुटांवर; जुन्या शहरात मिळणार पाच दिवसाला पाणी

जुन्या शहरातील १४ वॉर्डांची तहान भागविणारा हर्सूल तलाव दोन वर्षांनंतर यंदा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील १४ वॉर्डांची तहान भागविणारा हर्सूल तलाव दोन वर्षांनंतर यंदा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. २८ फूट पाण्याची क्षमता असलेल्या तलावात सध्या २६ फुटांवर पाणी आहे. त्यामुळे जुन्या शहराचा पाणीप्रश्‍न मिटला असून, १० ते १२ दिवसांनंतर मिळणारे पाणी सध्या सहा दिवसांआड दिले जात आहे. त्यात आणखी सुधारणा केली जाणार आहे.

जून महिन्यात मृग नक्षत्राच्या पावसाने यंदा जोरदार हजेरी लावली, पण त्यानंतर मोठे पाऊस झाले नाहीत. त्यामुळे जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात समाधानकारक पाणी आलेले नव्हते. पण, गेल्या महिनाभरात शहर परिसरात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला.

त्यानंतर हळूहळू हर्सूल तलावातील पाण्याची पातळी वाढत जाऊन सध्या २६ फुटांवर गेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हर्सूल तलावात १८ फूट पाणी झाले. हर्सूल तलावाची पाणी साठवण क्षमता २८ फूट एवढी आहे. आता एक ते दोन फूट पाणी वाढल्यास दोन वर्षांनंतर यंदा तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हर्सूल तलावात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे जुन्या शहरातील पाणी पुरवठ्यातील गॅप कमी झाला आहे. सध्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात सहा ते सात एमएलडी पाणी घेतले जात असून, जुने जलशुद्धीकरण केंद्रही सुरू केले जाणार आहे. त्यातून तीन एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर दहा एमएलडी पाणी जुन्या शहराला मिळेल.

जुने जलशुद्धीकरण केंद्रही सुरू करणार

उन्हाळ्यात जुन्या शहरातील काही भागाला दहा ते १२ दिवसांनंतर पाणी दिले जात होते. आता सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जुने जलशुद्धीकरण केंद्र शुक्रवारपासून (ता. २०) सुरू केले जाणार आहे. वाढीव पाणी मिळाल्यास पाण्याचा गॅप आणखी कमी केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे के.एम. फालक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

मोठी बातमी! बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर दहावीची 21 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा; प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा कधी? वाचा...

Pune: मोठी बातमी, पुण्यात पकडली लाखोंची रोकड! मालक नक्की कोण?

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

SCROLL FOR NEXT