Fake doctor  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : आरोग्य विभागाने 'मुन्नाभाई' डाॅक्टर पकडला

भानुदास धामणे

पथकाने मित्रा याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यावर त्याने मी डाॅक्टर असून येथील रुग्णांवर उपचार करतो. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर त्याची बोलती बंद झाली व त्याने ते देण्यास नकार दिला.

वैजापूर (जि.औरंगाबाद) : वैद्यकीय क्षेत्रातील Medical Sector कोणतीही पदवी नसताना गेल्या दोन वर्षांपासून रुग्णांवर खुलेआमपणे वैद्यकीय उपचार करणाऱ्या एका बंगाली मुन्नाभाई डाॅक्टरच्या Doctor आरोग्य विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाने त्याच्या दवाखान्यावर छापा टाकून इंजेक्शन्स, सलाईन व विविध प्रकारची १९ औषधी हस्तगत केली आहेत. या प्रकरणी त्याच्याविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सोतिश मित्रा ( वय ४५ , ह.मु रा. सासेगाव, ता. कन्नड, मूळ रहिवासी - पश्चिम बंगाल ) असे या बोगस डाॅक्टरचे Bogus Doctor नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिउद्दीन शेख यांना आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या पत्राव्दारे कळविण्यात आले की, तालुक्यातील मनूर येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात एका बंगाली बोगस डाॅक्टरने दवाखाना टाकून दुकान थाटले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करून तो त्यांच्या जिवाशी खेळत आहे. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, ग्रामविकास अधिकारी बी. आर. दाणे, आरोग्य विभागाचे पी. आर. कोळसे, सहशिक्षक व पोलिसांच्या पथकाने गावातील व्यापारी संकुलातील दवाखान्यात छापा टाकला Aurangabad असता तेथे नितीन मित्रा हा एका महिला रुग्णावर उपचार करीत होता.health department catch bogus doctor in vaijapur

पथकाने मित्रा याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यावर त्याने मी डाॅक्टर असून येथील रुग्णांवर उपचार करतो. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर त्याची बोलती बंद झाली व त्याने ते देण्यास नकार दिला. परंतु पथकाने त्याला दरडावून विचारणा केल्यानंतर त्याने माझ्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही सनद अथवा पदवी नसून मी याशिवाय दवाखाना चालवून रुग्णांवर उपचार करीत असल्याची कबुली त्याने दिली. पथकाने दवाखान्यातून इंजेक्शन, सलाईन व विविध प्रकारची औषधी हस्तगत करून या मुन्नाभाईस पोलिसांच्या मदतीने ठाण्यात नेले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोगस बंगाली डाॅक्टर नितीन मित्रा याच्याविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मनूर ग्रामपंचायतीच्या गाळ्यात या बोगस डाॅक्टरने दुकान थाटण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्याने त्याच्या वैद्यकीय सनदीची शहानिशा करून घेणे गरजेचे होते. परंतु त्यांनी शहानिशा न करता या मुन्नाभाईस गाळा भाडोत्री तत्त्वावर देऊन आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. यासाठी ग्रामविकास अधिकारीही तितकेच जबाबदार धरला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT