health news Medical tourism in Aurangabad Quality treatment at low cost sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत वाढतेय मेडिकल टुरिझम, आखाती देशातील रुग्णांचे प्रमाण वाढले

मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून आखाती देशातील १० ते १२ रुग्ण महिन्याकाठी उपचारासाठी औरंगाबादेत येत आहे.

- प्रकाश बनकर

औरंगाबाद : जागतिक वारसास्थळाच्या माध्यमातून जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर आलेले औरंगाबाद शहर हे आता वैद्यकीय पर्यटन म्हणून वाढीस लागत आहे. मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून आखाती देशातील १० ते १२ रुग्ण महिन्याकाठी उपचारासाठी औरंगाबादेत येत आहे. युरोपीय आणि अमेरिकेसह आखाती देशातील मेडिकल खर्चापेक्षा कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळत असल्यामुळे येथील रुग्णांचा ओढा शहराकडे वाढत असल्याचे चित्र आहे. अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी हजारो विदेशातील पर्यटक औरंगाबादेत दरवर्षी येतात. या पर्यटनवारीबरोबर येथील वैद्यकीय सुविधा चांगल्या असल्याने येमेनसह अन्य आखाती देशातील रुग्ण उपचारासाठी येतात. यात प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण, गुडघे, मणक्याचे आजार, दबलेली नस, (स्पाइन सर्जरी) जॉइंट रिप्लेसमेंट अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मेडिकल टुरिझम अंतर्गत हे रुग्ण भारतातील विविध शहरांत येतात.

यात औरंगाबादेतील उपचारपद्धती चांगल्या असल्यामुळे या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एमजीएम विद्यापीठात आखाती देशातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. त्यांचा संदर्भ घेत अनेक रुग्ण औरंगाबादेतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतात.

भारतीय डॉक्टरांची उपचारपद्धतीची जगभर ख्याती पोचली आहे. त्यामुळे कमी खर्चात, दर्जेदार वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात. विशेष म्हणजे औरंगाबादेतील काही डॉक्टर हे वर्षांतून एक ते दोन वेळा आखाती देशात जाऊन सेवा देतात. यात औरंगाबादच्या डॉ. शिवकुमार संतपुरे हे वर्षभरात चार वेळा इराण-इराकला जाऊन वैद्यकीय सेवा देतात. डॉ. संतपुरे यांनी आठ देशातील २०० रुग्णांवर औरंगाबादेत त्यांच्या रुग्णालयात उपचार केले आहेत.

आखाती देशातील बरेच विद्यार्थी आपल्याकडे शिकायला आहे. त्यांचा रेफरन्स देऊन उपचारासाठी येतात. यात आखाती आणि यमन देशातील रुग्णांचा समावेश आहे. युरोप व इतर देशांत येणाऱ्या मेडिकल खर्चाच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी येतो. जगातील सर्वांच चांगली उपचारपद्धती देशात कमी खर्चात मेडिकल सुविधा मिळत असल्याने हे रुग्ण येत आहेत.

- डॉ. आशिष गाडेकर, एमजीएम रुग्णालय, महाविद्यालय

आखाती देशातून मेडिकल टुरिझमअंतर्गत उपचारासाठी शहरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिन्याकाठी १० रुग्ण शहरात येतात. यात जॉइंट रिप्लेसमेंट, पाइन, सर्जरी अशा विविध आजारांसाठीच रुग्ण येतात. युरोपीय देशांतील मेडिकल खर्चापेक्षा कमी आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत असल्याने हे रुग्ण भारतात येतात.

- डॉ.एम. बी. लिंगायत, ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख, घाटी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT