पाचोड (जि.औरंगाबाद) : शेती हंगाम बेभरवशाचा खेळ आहे. कधी होत्याचे नव्हते होईल. याचा नेम नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पुन्हा एकदा खरं ठरलं. गत महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता.एक) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक रौद्ररुप धारण केले. प्रचंड विजेच्या कडकडाट व ढगाच्या गडगडाटात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पाचोड (ता.पैठण) (Paithan) सर्वत्र हाहाकार उडाला. सलग पाऊण तास जोरदार मुसळधार पाऊस (Rain) झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांत पाणी, तर ठिकाणी गावाकडे परतणाऱ्या नागरिकांचा अन् रस्त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक धो... धो पडलेल्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेले अन् अगोदरच पूर्णतः पाण्यात बुडालेले बाजरी, कापूस, तूर, ऊस, सोयाबीन आदी पिकांना पावसाच्या (Aurangabad) दोन दिवसाच्या उघडीपनंतर पुन्हा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सर्वच पिके जमीनदोस्त होऊन या मुसळधार पावसामुळे (Rain In Aurangabad) खरीप हगामातील सर्वच पिके हातची जाण्याच्या मार्गावर आहेत.
पाचोड महसूल मंडळात पावसाने थैमान घातल्याने केकत जळगाव, हर्षी, थेरगाव, लिंबगाव, दावरवाडी, नांदर, दादेगाव हजारे, मुरमा, कडेठाण, कोळी बोडखा, वडजी, रांजनगाव दांडगा, खादगाव आदी भागातील उभ्या पिकांना पावसाचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे असंख्य शेतातील माती खरडून गेली. शिवाय शेतातील बांधही पावसाच्या पाण्याने फुटून गेल्याचे पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील इतरही गावांत पावसाने हजेरी लावलेली आहे. गत दीड महिन्यापासून दररोजच रात्री तर कधी दिवसा पाऊस हजेरी लावत आहे. या पावसासह वाऱ्यामुळे गोदावरी पट्ट्यात उसाचे पिक जमिनीवर आडवे झाले. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने कपाशीला लागलेली बोंडे काळी पडून सडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नकसान झाले आहे. तर काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरीच्या कणसांना कोंब फुटत आहेत. एकंदरीत सर्वच पिके संकटात सापडली आहे. मागील आठवडयासह आजच्या पावसाचा कहर इतका जबरदस्त होता की, सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. नद्या, नाले ,तलाव, ओढे, पाण्याने तुडूंब भरून वाहीले. या पाण्यामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. मोसंबी, डाळिंब, बागेत पाणी तुंबल्याने या फळबांगाची मोठी हानी होणार आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. केकत जळगाव व पाचोड - विहामांडवा तसेच रांजनगाव दांडगाने खादगाव रस्त्यावर जवळून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामूळे बराच वेळ वाहतूक खोळंबुन गावांचा संपर्क तुटला होता. सर्व शेतशिवार जलमय झाले. शेतांना तलावाचे तर पिकांतुन वाहणाऱ्या पाणी पाहून 'त्या ' पाण्यास ओढ्याचे स्वरुप आल्याचे पाहावयास मिळाले
फळबागांची अवस्थाही गंभीर
सततच्या मुसळधार पावसाने फळबागांचेही प्रचंड नुकसान होत असून पाणी साचल्याने झाडांच्या पांढऱ्या मुळया सडुन झाडे वाळत आहे. सर्वत्र मोसंबीच्या शेतांमध्ये पाणी साचले आहे. परिणामी, शेतातील उभे पिके पाण्यामुळे सडू लागली असून सोयाबीन, कापूस, बाजरी पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. पाचोड परिसरातील सर्वच पिके या वर्षीच्या पावसामुळे सर्व वाया गेले. अगोदरच कोरोना संकट काळात शेतकरी हैराण झाले असून नैसर्गिक आपत्तीमुळेही शेतकरी आता पुन्हा संकटात सापडला आहे. पाचोडसह परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडवला आहे. जिकडे पाहावे तिकडे पाणी वाहत आहे. नदी, नाले तर प्रवाही झाले आहेतच. शिवाय नद्या, विहीरी, नाले, तलाव, तुडूंब झाल्या असून अनेकांची बोअरवेल्स वरून वाहत आहे. सर्वत्र शेतीला अक्षरश: तळ्याचे स्वरुप आले आहे.
सोबत : फोटो
पाचोड :१ ) मोसंबीच्या बागेत साचलेले पाणी २) सोयाबिनच्या पिकांत साचलेले पाणी व इतर
( छायाचित्रे : हबीबखान पठाण, पाचोड
[21:39, 01/10/2021] Habib Pathan, Pachod: व्हिडिओ-- रांजणगाव दांडगा
व केकत जळगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.