sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : घाटी रुग्णालयातील यंत्र, चिकित्सालयीन सामग्री नेमकी किती ; विद्यापीठाच्या पथकाकडून तपासणी

याची तपासणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने गठीत समितीकडून गुरुवारी (ता. ११) करण्यात आली. याचा सील बंद अहवाल विद्यापीठाला सादर केला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णातील रुग्णसंख्या, वॉर्ड, यंत्र आणि चिकित्सालयीन सामग्री किती आहे, याची तपासणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने गठीत समितीकडून गुरुवारी (ता. ११) करण्यात आली. याचा सील बंद अहवाल विद्यापीठाला सादर केला जाणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) महाविद्यालयाची शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ करिता संलग्नता वाढवण्यासाठी या पथकाने गुरुवारी अचानक भेट देत तपासणी केली.धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अरुण मोरे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत नाशिक येथील डॉ. सुवासिनी सोनवडेकर, धुळे येथील डॉ. भाग्यश्री अहिरराव, डॉ. अरुण दोदामणी यांचा समावेश होता.

या समितीने सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत अपघात विभाग, बाह्य रुग्ण विभागासह काही वॉर्डातही भेट दिली. यात बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण संख्या, अपघात विभागातील परिस्थिती याची माहिती त्यांनी घेतली. याचा अहवाल तयार करीत तो सील बंद केला. हा अहवाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांनी संवादही साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT