Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : वेश्या व्यवसायासाठी विवाहितेला जबरदस्ती! पतीचे अनैसर्गिक कृत्य अन् विनयभंग; पोलिसांनीही घेतली नाही तक्रार

अखेर विवाहितेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता, न्यायालयाच्या आदेशाने सासरच्या मंडळींविरोधात २३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : विवाहितेचा दोन वर्षांपासून छळ करण्यात आला. त्यानंतरही ती घर सोडून जात नसल्याने सासरच्या मंडळींनी चक्क तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच पतीला घटस्फोट देऊन टाक, अन्यथा ठार मारून टाकीन अशी धमकी दिल्याचा प्रकार सातारा परिसरात समोर आला.

विशेष म्हणजे, विवाहितेचा सगळे मिळून छळ करायचे, तर पती अनैसर्गिक कृत्य करून त्रास देत असे आणि दिरासह सासरचे इतर मंडळी तिचा विनयभंग करत. अखेर विवाहितेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता, न्यायालयाच्या आदेशाने सासरच्या मंडळींविरोधात २३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी विवाहितेने सातारा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २१ एप्रिल २०२१ पासून ७ जुलैदरम्यान सातारा परिसरातील देवळाई भागात घडत होती. सासरचे मंडळी विवाहितेला वारंवार तुझ्या आईवडिलांनी लग्नात खर्च केला नाही म्हणत हुंड्याची मागणी करत असत, तर पतीकडून तिला सतत छळ करून बेल्टने मारहाण करण्यात येत होती.

विशेष म्हणजे विवाहितेने हा त्रास दोन वर्षांपासून सहन केला. पती तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तिला त्रास देत असे, तर घरातील दिरासह इतर सदस्यांकडून घरात वावरताना नेहमीच तिचा विनयभंग करण्यात येत होता. घरातील सदस्यांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली, तसे न केल्यास पतीला घटस्फोट देऊन टाक, अन्यथा ठार मारून टाकीन अशी धमकी दिल्यानंतर मात्र विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला होता.

मात्र सातारा पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर विवाहितेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तक्रार अर्जाची शहानिशा करून पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने सातारा पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. दरम्यान २३ ऑगस्टरोजी सासरच्या १० जणांविरोधात छळ करणे, विनयभंग करणे, मारहाण करणे आदी कलमांनुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT