औरंगाबाद : शिरखुर्म्यासाठी बोलवण्याची लायकी त्यांची राहिलेले नाहीत. आम्ही पहिल्यांदा त्यांना प्रेमाने बोलवले होते. मात्र त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, त्यामुळे त्यांनी कुठेही जागा शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळे त्यांना लांबूनच ईदच्या शुभेच्छा !, असा टोला खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला. आज मंगळवारी (ता.तीन) ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी तर सर्वप्रथम औरंगाबादच्या पोलिसांना मनापासून धन्यवाद करतो. औरंगाबादच्या (Aurangabad) आत असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, की औरंगाबादमध्ये काही तर होईल. (Imtiaz Jaleel Criticize Raj Thackeray Over Sabha In Aurangabad)
येथील वातावरण खराब होईल. मात्र येथील सर्व हिंदू-मुस्लिम जनतेबरोबर आमच्या दलित बांधवांसह पोलिसांचेही मनापासून आभार मानतो. जेव्हा आपण टीम म्हणून काम करतो तेव्हा शहराच्या आत कोणतीही घटना होऊ देणार नाही. त्याचाच परिणाम आहे, की आज संपूर्ण देशाची नजर औरंगाबादवर होती.
औरंगाबादमध्ये स्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पोलिसांनी आपले काम चांगल्या प्रकारे केले. जनतेनेही चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच औरंगाबादमध्ये शांततापूर्ण वातावरण राहिले आहे, असे जलील म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.