Raj Thackeray And Imtiaz Jaleel esakal
छत्रपती संभाजीनगर

इफ्तार पार्टीला या ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : राज ठाकरे साहेब येणार आहेत. त्यांची सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिले आहे. आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. ९९ टक्के लोक शांतता प्रिय असतात. (Imtiaz Jaleel Invites Raj Thackeray For Iftar Party In Aurangabad)

लहान-मोठे व्यापारी सर्व जातीधर्मातील लोक आहेत. त्यांना भीती आहे. सभेमुळे काही अनुचित प्रकार घडेल. सरकार व प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करावे. मात्र जोर जबरदस्ती होऊ नये, असे मशिदींवरील भोंग्याच्या राजकारणावर जलील यांनी आपले मत नोंदवले. तीन पक्षांना हिंदूंचे रक्षण करणार कोण आहे ? असा प्रश्न पडला आहे. भाजप, शिवसेना आणि मनसे हे त्या स्पर्धेत आहेत. राज ठाकरे हे आपल्या अजेंड्यासाठी औरंगाबादला (Aurangabad) येत आहेत. त्यांच्या सभेमुळे काही अनुचित प्रकार तर होणार नाही ना याची चिंता धंदा, कारोबार करणाऱ्याला आहे. आम्ही शत्रू नाहीत. तुम्ही सभेपूर्वी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

पोलिस विभागाला विश्वास द्यायला आलो होतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी खासदार म्हणून दिवाळीचा फराळ खायला जातो. मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देतो, की त्यांनी ईदच्या दिवशी ईदग्याजवळ यावे आणि एकमेकांना शुभेच्छा द्यावेत, असे आवाहन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या अजेंड्यानुसार काम करतो. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की एकता शहरात टिकून राहावी. आम्ही धर्म व जातीविरोधात बोललो नाहीत. कायद्यापुढे कोणीही मोठे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल (भोंग्यांबाबत) दिले आहे. त्याचे पालन करण्यासाठी एजन्सींची नियुक्त केली पाहिजे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT