Imtiaz Jaleel On MVA Esakal
छत्रपती संभाजीनगर

Imtiaz Jaleel On MVA: "तुमच्यामुळे पडलो म्हणू नका," महाविकास आघाडीचा प्रतिसाद नाही, जलील यांचा इशारा

Imtiaz Jaleel On MVA: एमआयएमची २०१९ मध्ये लोकसभेत वंचितसोबत आघाडी होती. त्यानंतर विधानसभेत जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये बिनसले होते.

आशुतोष मसगौंडे

छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. एमआयएम मात्र नवीन भिडूच्या शोधात आहे.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट केली आहे. आज मी निवडणूक तुमच्यासोबत लढायला तयार आहे. तुम्ही जर मला तुमच्यासोबत नाही घेतलं आणि उद्या निवडणूक एकट्यानं लढलो, तर माझ्याकडे बोट दाखवू नका. तुमच्यामुळे आम्ही पडलो असे म्हणू नका, असा इशारा महाविकास आघाडीला दिला आहे.

इम्तियाज जलील यांनी यापूर्वी महाविकास आघाडीत येण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत, पण तुम्ही घेत नाही, असे विधान केले होते. आता महाविकास आघाडीत तिकीट वाटपासाठी बैठकांचा जोर वाढलेला असताना इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाद्वारे महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, महाविकास आघाडीकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचीही चर्चा सुरू झाली होती.

एमआयएमची २०१९ मध्ये लोकसभेत वंचितसोबत आघाडी होती. त्यानंतर विधानसभेत जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये बिनसले होते. २०२४ मध्ये एमआयएमने अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठिंबा दिला; तसेच अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांनाही पाठिंबा दिला होता.

पण एमआयएमसोबत कधीही जाणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित आणि एमआयएम यांची २०२४ च्या विधानसभेत आघाडी होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

Latest Maharashtra News Updates : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा, ४५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT