Imtiaz Jaleel over investigate kolhapur incident in gajapur Sakal
छत्रपती संभाजीनगर

गजापुरातील घटनेची सखोल चौकशी करा; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, इम्तियाज जलिलांची मध्यस्थी

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : कोल्हापुरातील गजापूर येथील धार्मिक स्थळ, अल्पसंख्याक समाजावरील हल्ल्याच्या निषेधार्थ एमआयएमतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्याचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ जात असताना निदर्शक आक्रमक झाले.

घोषणाबाजी सुरू झाली. जमाव आक्रमक होताच पोलिस अलर्ट झाले. तत्काळ इम्तियाज जलील यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. येथून निघून जा, गर्दी कमी करा... अशी सूचना केली. पंधरा मिनिटे घोषणाबाजीचा प्रकार सुरू होता. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना निवेदन दिले.

शिष्टमंडळात जमात-ए-इस्लामीचे अब्दुल कवी फलाही, अय्युब जहागीरदार, अरुण बोर्डे, नीता मोरे यांचा समावेश होता. निवेदनात म्हटले आहे, की धार्मिक स्थळ, अल्पसंख्याक समाजावर हल्ला करणाऱ्यांवर यूएपीए कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात यावी.

संबंधित निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या मुस्लिम समाजबांधवांच्या घरांची नुकसानभरपाई देण्यात द्यावी. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी पाच लाख रुपये सरकारतर्फे देण्यात यावे. मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे त्वरित विशेष अधिवेशन बोलावून पारित करण्यात यावे. या सर्व घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर, माजी गटनेता नासेर सिद्दिकी, फिरोज खान, माजी नगरसेवक मीर हिदायत अली, आरेफ हुसेनी, शोएब खान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलील यांच्या आवाहनाकडे पाठ

येथे पक्षाचा काहीही संबंध नाही. गजापूरच्या घटनेचे ज्यांना दु:ख आहे त्यांनी धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुस्लिम नेत्यांना केले होते. मात्र या आवाहनास इतर नेत्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे शुक्रवारी दिसून आले.

सरकारविरोधात घोषणाबाजी

जमावाने हातात फलक झळकावून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. गजापूर येथील घटनेचाही निषेध व्यक्त केला. धरणे आंदोलनादरम्यान इम्तियाज जलील, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, आरेफ हुसेनी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT