Raj Thackeray And Imtiaz Jaleel esakal
छत्रपती संभाजीनगर

राज ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्यावर इम्तियाज जलील म्हणाले, वेळ आल्यावर बोलू

एमआयएमच्या राज्यातील कार्यकर्त्यांनाही...

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.दोन) पार पडलेल्या पक्षाच्या शिवाजी पार्क येथील गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे खाली उतरवा असे वक्तव्य केले होते. त्यावरुन राज्यातील राजकारणात राजकीय वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी ठाकरे यांचा कोल्हापूरमध्ये बोलताना समाचार घेतला. राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत होतात. मग मध्येच येऊन एखादं लेक्चर देतात, असा टोला पवार यांनी त्यांना लगावला. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, ज्या मिशिदींबाहेर भोंगे लागलेले असतील, त्या मशिदीसमोर दुप्पट स्पीकर लावू. त्यावर हनुमान चालीसा लावा, असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. (Imtiaz Jaleel Say, No Comments On Raj Thackeray Speech)

तसेच मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदी आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास त्यांना अनेक गोष्टी कळतील, असे ठाकरे म्हणाले. यावर एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मी राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सध्या आम्हाला त्यावर बोलायचं नाहीय, अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली.

आम्ही वेळ आल्यावर बोलू. आता काही बोलणार नसल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT