इम्तियाज जलील.jpg 
छत्रपती संभाजीनगर

उद्धव ठाकरे, मोदींनी टिव्हीवर येताना गरिबांचाही विचार करावा: इम्तियाज जलील

गणेश पिटेकर

आम्ही सरकारला विनंती करतो की साबळेंसारख्या आत्महत्याच्या घटना शहरात आणि राज्यात होऊ नये. याची काळजी सरकारने घेऊन लवकरात-लवकर कोणत्या प्रकारची मदत दिली जाऊ शकते, याचा विचार करावा.

औरंगाबाद : रिक्षावाल्यांसाठी १५०० रुपयांची मदत जाहीर केली. पण ती आतापर्यंत किती लोकांना मिळाली याची माहिती सरकारनेच द्यायला हवी, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) केला आहे. आज सोमवारी (ता.२४) ते माध्यमांशी बोलत होते. श्री जलील म्हणाले, की पूर्ण लाॅकडाऊन (Lock Down) आहे. लोक रस्त्यावर नाहीत. रिक्षा जरी बाहेर निघत असल्या तरी त्यांना प्रवाशी मिळत नाहीत. दिवसभर बसल्यानंतर दोन-तीन प्रवाशी मिळतात. त्याने पोट भरतील का कर्जाचे हप्ते देतील? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना विनंती आहे, की टिव्हीवर येताना गरिबांचाही विचार करावा. (Imtiaz Jaleel Suggests To Uddhav Thackeray, Narendra Modi Talks About Poor On Tv)

तरुण आत्महत्या करित आहेत. त्याला कोणी तरी जबाबदार असणारच. सरळी ही जबाबदारी सरकारवर जाते, असा हल्लाबोल त्यांनी केला. आम्ही सरकारला विनंती करतो की साबळेंसारख्या आत्महत्याच्या घटना शहरात आणि राज्यात होऊ नये. याची काळजी सरकारने घेऊन लवकरात-लवकर कोणत्या प्रकारची मदत दिली जाऊ शकते, याचा विचार करावा. वित्तीय संस्था आणि बँकांच्या रिकव्हरी एजंट्सकडून दमदाटी करुन कर्जदार आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देऊन वसूली केली जात आहे. हे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी वित्तीय संस्था व बँकांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT