Aurangabad Corona News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६५ टक्के रुग्ण घरीच घेणार उपचार

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची (Corona) दुसरी लाट आटोक्यात आल्याने आता प्रशासन तिसरी लाट रोखण्याच्या तयारीला लागले आहे. तिसऱ्या लाटेत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या साडेसहा हजारांपर्यंत जाऊ शकते, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६५ टक्के तीव्र लक्षणे नसलेले रुग्ण घरीच राहून उपचार घेतील, असे नियोजन करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना संसर्गाची (Corona Infection In Aurangabad) दुसरी लाट शहरात ओसरली आहे. सोमवारी (ता. २६) शहरात केवळ चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. असे असले तरी ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार प्रशासनस्‍तरावर तयारी केली जात आहे. (in third wave of corona 65 patients to be take treatment at home aurangabad live news glp88)

गरवारे कंपनीतर्फे बालकांसाठी १२५ बेडचे कोविड केअर सेंटर उभारून दिले आहे. तसेच एमजीएम रुग्णालयात (Aurangabad) शंभर बेडचे कोविड सेंटर उभारले जात आहे. मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये बालकांसाठी ५० बेड राखीव असतील. सिडको एन-८ येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातही ५० बेडचे कोविड प्रसूतिगृह तयार करण्यात आले आहे.

तसेच एक सीसीसी, नऊ डीसीएचसी, दहा डीसीएच याप्रमाणे रुग्णालय राहणार असून त्यामध्ये एनआयसीयू ७३, पीआयसीयू १६५, एचओटू ६७१ अशा ९१९ बेडची व्यवस्था असणार आहे. तसेच नागरिकांसाठी कोविड सेंटरसह रूग्णालयात सात हजार ७३३ बेड असतील. त्यासोबतच तिसऱ्या लाटेत किती जण बाधित होऊ शकतात याचा अंदाजही बांधला जात आहे. दुसऱ्या लाटेत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या ११ हजार २२६ होती तर होमआयसोलेशनचे रूग्ण देखील पाच हजारवर होते. तिसरी लाट जास्त तीव्र नसेल, अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ५० टक्क्यांनी कमी म्हणजेच सहा हजार २५७ एवढे असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तीव्र लक्षणे नसलेली रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर म्हणजेच ६५ टक्क्यापेक्षा जास्त असेल. त्यामुळे हे रुग्ण घरीच राहून उपचार घेऊ शकतात, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT