एकाचे वेतन दुसऱ्याच्या खात्यात! Sakal
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur ST News : एसटीच्या वैजापूर आगारातील अजब प्रकार; एकाचे वेतन दुसऱ्याच्या खात्यात!

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : एसटी महामंडळाच्या वैजापूर आगारात कर्मचाऱ्यांचे वेतन करणाऱ्यांनी चाळीस हजार वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात वीस-तीस हजार, तर वीस हजार वेतन असलेल्यांच्या खात्यात तीस- चाळीस हजार जमा केले आहेत. हा प्रकार पाहून काहींना सुखद अनुभव आला, तर काहींनी संताप व्यक्त केला. या प्रकाराबद्दल आगार प्रमुखांनी असा प्रकार झाल्याचे मान्य करत ज्याची रक्कम त्याला मिळेल, असे सांगितले.

शनिवारी हा प्रकार घडला. शासनाने एसटीला वेतनासाठी अनुदान दिल्यानंतर शनिवारी बहुतांश आगारांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ऑनलाइन वाटप करण्यात आले. वैजापूर आगारात तब्बल १९० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना वेतन देताना, कुणाच्या खात्याची रक्कम, कुणाच्या खात्यावर अशी परिस्थिती झाली. ज्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार वेतन आहे, त्याला वीस हजार मिळाले, तर कुणाला तीस हजार वेतन मिळणे अपेक्षित असताना त्याला पन्नास हजार मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कर्मचारी त्रस्त

एसटीच्या कर्मचाऱ्यांना अगोदरच तुटपुंजे वेतन आहे. त्यात वेतनाचे पैसे कमी-जास्त प्रमाणात वाटप करण्यात आल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. ही रक्कम ज्यांच्या खात्यात जास्तीची गेली त्यांच्याकडून वसूल करून कमी रक्कम गेलेल्या खात्यात पुन्हा वर्ग करताना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.

मुळात अनेक कर्मचाऱ्यांनी रक्कम मिळाल्यानंतर ती खर्च करून टाकली आहे. आता वसुली करतानाही खात्यातून एकदम रक्कम वळवता येणार नाही. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे विविध कर्जांचे हफ्ते आहेत, त्यांना आवश्यक रक्कम वेळेवर मिळेल किंवा नाही याबद्दल साशंकता आहे.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. विभागीय पातळीवर लेखाधिकारी हे पद आहे, आगार पातळीवर लेखाकार हे पद आहे. मात्र, कर्मचारी नसल्याने दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचा प्रघात एसटीमध्ये पडलेला आहे. वैजापूर आगारातही लेखाकार पद रिक्त आहे, त्यांच्या जागेवर इतर कर्मचाऱ्याला पदभार देऊन काम करून घेतले जात आहे. सदर कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला आहे.

वैजापूर आगारात वेतन रक्कम मंजुरी देताना कर्मचाऱ्यांच्या खात्यांचे क्रमांक खाली-वर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम कमी-जास्त पडली आहे. यात कुठलाही घोटाळा झालेला नाही. मात्र, कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा केल्याने हा प्रकार झाला आहे. घटना लक्षात आल्यानंतर तातडीने दखल घेऊन टीम पाठवली. ही रक्कम दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांनी रक्कम खर्च केली, त्यांच्याकडून पुढच्या महिन्यात वसूल केली जाणार आहे.

- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT