संभाजीनगरमध्ये वाहनांची संख्या भरमसाठ वाढत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ८२ हजार नवीन वाहनांची भर पडली. आता जिल्ह्यात आतापर्यंत नोंदवलेल्या वाहनांची संख्या तब्बल १६ लाख ७० हजारांवर पोचली आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी साडेसहा हजार वाहनांची भर पडत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बघितले तर साठ टक्के वाहनांचे प्रमाण आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात वाहनांची संख्या भरमसाठ झाली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा ही बाब नित्याची झाली आहे. अनेकवेळा कारण नसताना अचानक रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढते आणि वाहतूक नियंत्रणात अडथळे निर्माण होतात. दिवसेंदिवस अशी समस्या वाढत आहे. त्याला कारण केवळ भरमसाट वाढणारी वाहनेच आहेत.
जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये १३ लाख ६८ हजार ४०७ वाहने होती. ही संख्या आता तब्बल १६ लाख ७० हजार ३०८ इतकी झाली आहे. गेल्या वर्षभरात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या एकाच वर्षात ८२ हजार ७२७ वाहने वाढली आहेत. वाढलेल्या वाहनांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.९२ टक्के आहे
शहरात आतापर्यंत स्मार्ट शहर बस येईपर्यंत पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. त्यामुळे साहजिकच एका घरात तीन-चार दुचाकी अशी परिस्थिती वाढत गेली. घरातील प्रत्येक सदस्यांना स्वतंत्र वाहन अशी गरज निर्माण झाल्याने शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. याशिवाय बॅंकांकडून मिळणारे सहज कर्जही वाहन वाढीला कारणीभूत ठरत आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत वाहने ६० टक्के जिल्ह्यातील लोकसंख्या ही जवळपास २५ लाखांच्या घरात पोचली. वाहनांची संख्या १६ लाख ७० हजार ३०८ इतकी आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणेच वाहनांचीही संख्या भरमसाठ वाढत आहे. हे गणित लक्षात घेतले तर वाहनांची संख्या लोकसंख्येच्या जवळपास ६० टक्के झाली. शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि एकूणच शहराची स्थिती बघितली तर भविष्यात वाढत्या वाहनांची संख्या चिंताजनकच आहे.
शहरात नेहमीचा वाहतूक खोळंबा
भरमसाट वाढणारे प्रदूषण
इंधनाचा भरमसाट वापर
अपघातांच्या प्रमाणात वाढ
आवाजाचे वाढते प्रदूषण
आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
पार्किंगची समस्या
पायी चालणाऱ्यांना त्रास
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.