Chhatrapati sambhajinagar historical evidence Sakal
छत्रपती संभाजीनगर

Inscription In Marathwada : इतिहासाच्या पाऊलखुणा : जटवाडा येथील देवनागरीतील शिलालेख

सकाळ वृत्तसेवा

संपूर्ण मराठवाड्यात इतिहासाच्या पाऊलखुणा दिसतात. काळाच्या ओघात या पाऊलखुणा अडगळीत पडल्या. या प्रत्येक शिल्प वा कलाकृतीचे जतन व संवर्धन झाले पाहिजे, अन्यथा हा वारसा कुठेतरी गडप होईल आणि पुढील पिढी इतिहासापासून दुरावेल. इतिहासाची ओळख असणाऱ्या अशाच ऐतिहासिक गोष्टी ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ या वृत्तमालिकेमधून देत आहोत.

इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना ऐतिहासिक जटवाडाही अशाच देदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार आहे. इथल्या जटवाडा-राहाळपट्टी तांडा येथे एका मंदिराचे बांधकाम सुरू असताना शिलालेख सापडला. हा शिलालेख देवनागरी लिपीतील असल्याने हा यादवकालीन असावा, असे तज्ज्ञांनी सांगितले.

 देवगिरीच्या (दौलताबाद) पूर्वेला जटवाडा गाव आहे. जटवाड्याची रचना वास्तू रचनेप्रमाणे एकमेवाद्वितीय आहे. म्हणजे हे गाव नीट वसवले गेलेले आहे. गावातून छत्रपती संभाजीनगर ते काटसावरी फाटा असा समृद्धी महामार्ग गेलेला आहे.

इथे जैनधर्मीयांचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तसेच जटेश्वर महादेव मंदिर असून ते खाम नदीच्या उगमस्थानावर आहे. या मंदिराचा उल्लेख शिवपुराण ग्रंथात आढळतो. इथेच प्रसिद्ध अय्यबाबाचे मंदिर आहे. त्यांना जादूगारबाबा असेही ओळखले जाते.

इथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला मोठी यात्रा भरते आणि त्याला गर्दी असते. याच मंदिराचे बांधकाम सुरू असताना २०२२ मध्ये शिलालेख सापडला. बांधकामावरच्या लोकांना याविषयी माहिती नसल्याने ते तो शिलालेख तसाच ठेवणार होती.

इतिहास संशोधक शिवाजी गायकवाड यांना हा शिलालेख दिसला आणि त्यांनी याची दखल घेत शिलालेख स्वच्छ केला. त्यांनी राज्य पुरातत्त्व विभागाचे डॉ. कामाजी डक यांना शिलालेखाचे फोटो पाठवले. तेव्हा शिलालेख हा देवनागरीत असल्याचे गायकवाड यांना कळविले. या शिलालेखाचे अद्याप पूर्ण वाचन झालेले नाही. हा शिलालेख प्रथमच सापडला असा दावा मात्र गायकवाड यांनी केला. 

नागरिकांना आवाहन

इतिहास म्हणजे नुसत्या कथा नव्हे! तर इतिहासातून आपल्या समृद्ध वारशाची जपणूक होते, प्रेरणा मिळते. आपल्या पूर्वजांनी भव्य वास्तू उभ्या केल्या होत्या, शिलालेख कोरून ठेवले, यातून त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. परंतु, सध्या हा वैभवशाली वारसा कुठेतरी पडलेला दिसून येतो. त्यामुळे नागरिकांनी अशा वास्तू, शिल्प आढळले तर मो. नं. ७०२८०२८३०६ या क्रमांकावर संपर्क करावा.

हा शिलालेख देवनागरी लिपीतील असल्याने यादवकालीन असल्याची शक्यता आहे. मात्र, शिलालेख नीट स्वच्छ व्हायला हवा होता. तेव्हाच याचे वाचन करता येईल. तसेच या शिलालेखाची इथल्या अभ्यासकांनी नोंद घेतली होती का, याविषयी माहिती नाही.

- डॉ. कामाजी डक, पुरातत्त्व समन्वयक, राज्य पुरातत्त्व विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai University Senate Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार

Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

Latest Marathi News Updates : हरियाणामध्ये काँग्रेस 60 अन् भाजप 20 जागा जिंकणार - सत्यपाल मलिक

मोदींकडून अवास्तव कौतुक; सेहवागच्या कर्मचाऱ्याला लाखोंचा भूर्दंड, विरुच्या ट्विटनं खळबळ

Bigg Boss Marathi 5 : "ती सगळं फुटेजसाठी करते" ; पत्रकारांसमोरच निक्की-जान्हवीचं वाजलं

SCROLL FOR NEXT