माझ्याकडे चिल्लरच नाही, मी कुठून देऊ ?  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar ST News : माझ्याकडे चिल्लरच नाही, मी कुठून देऊ ? बसप्रवासात सुट्या पैशांअभावी गैरसोय

MSRTC BUS Latest News |वाहक तिकिटाच्या मागे राहिलेली रक्कम लिहून देतो. अनेकदा चिल्लरमुळे वाहक-प्रवाशांत वादही होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

उमरी : शासनाने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सवलत दिली तरी जे सर्वसाधारण प्रवासी बस प्रवासाला निघतात त्यावेळी चिल्लर पैसे नसल्याने पंचायत होते. यावेळी वाहकही म्हणतो की, माझ्याकडेही चिल्लर नाही, सर्वांनी पाचशेची नोट दिल्यावर मी कुठून चिल्लर देणार, असा संवाद हमखास ऐकायला मिळतो. मग वाहक तिकिटाच्या मागे राहिलेली रक्कम लिहून देतो. अनेकदा चिल्लरमुळे वाहक-प्रवाशांत वादही होत आहेत.

राज्यात सरकारने अर्ध्या तिकिटावर महिलांसाठी प्रवासात सवलत दिली आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक, पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत सवलत दिली. सर्वसाधारण प्रवाशांची चिल्लरअभावी गैरसोय होत आहे. अनेकदा यामुळे

वाहक तिकिटाच्या पाठीमागे लिहून दिले ते चिल्लर पैसे शहरातील आगार प्रमुखाकडे जाऊन तिकीट दाखवून चिल्लर पैसे देऊ शकतो असे सरकारचे आदेश आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वाहकाकडे चिल्लरसाठी हुज्जत घालू नये अशी माहिती आगारप्रमुख, आगार नियंत्रण कक्षातून देण्यात आली. दरम्यान, अलीकडच्या काळात खासगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा प्रवासी एसटी महामंडळास प्राधान्य देत आहेत.

आम्ही खेड्यातील असून आमच्याकडे चिल्लर पैसे नसतात. तसे बसने प्रवास करताना वाहकाकडे चिल्लर पैसे असायला पाहिजे.

— श्रीनिवास पाटील ढगे, रा. इज्जतगाव, ता. उमरी

शहरातून बसने गावाकडे जाताना जवळ समजा पाचशे रुपयांची नोट असते त्यावेळी चिल्लर पैसे द्या असे वाहक सांगतात. तेव्हा साहेब चिल्लर नाही. त्यानंतर तिकिटाच्या मागे वाहक रक्कम लिहून देतात. गावच्या स्टॉपवर उतरताना चिल्लर घेण्याची फजिती होते. एखादा वाहक समजूदारपणे चिल्लर देतो तर एखादा वाहक चिल्लर असून देत नाही.

— आनंदराव पाटील भायेगावकर, उमरी.

प्रवाशांनी बस प्रवासात चिल्लर पैसे ठेवले तर अतिउत्तम. आमच्याकडे चिल्लर राहिल्यास देऊच. तसे आम्ही ड्यूटीवर येताना चिल्लर पैसे घेतोत. जर आमच्याकडे नाहीच तर ते तिकीट बसस्थानकात गेल्यास वाहतूक अधिकाऱ्यांकडे गेल्यास ते चिल्लर पैसे देऊ शकतात.

— मारुती पवार, वाहक, भोकर डेपो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT