जालना : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे युद्ध पातळीवर काम सुरु आहे, असे असले तरी आश्चर्य म्हणजे महामार्गावर चक्क व्यापाऱ्याने मका वाळत घातली आहे.
जामवाडी (ता.जालना) परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. जामवाडी ते नवीन मोंढ्यात येणारा रस्ता आहे. या परिसरात महामार्गाचे काम चालू असून परिसरात वळण रस्त्यावर अनेक सिमेंट कठडे लावण्यात आलेले आहेत. आश्चर्य म्हणजे महामार्गाचे काम चालू असून ट्रकसह जड वाहने सतत ये जा करतात. बुधवारी (ता.२०) महामार्गावर मोंढ्यातील एका व्यापाऱ्याने चक्क मकाचे पोते आणून वाळत घातली आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून वाहनांचा अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्य रस्त्यावर काम चालू असल्याने याठिकाणी मका वाळत घालण्यासाठी कुणी परवानगी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे. याठिकाणी काम चालू असतात चक्क मका वाळत घातली जाते, त्यांनी मका वाळत घालण्यासाठी कुणी परवानगी दिली, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशपांडे यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.