sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : मुंबईची वारी होणार भारी

जालना ते मनमाड मार्गाची यशस्वी चाचणी, उद्या लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मनमाड ते जालना रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले. यामुळे जालना येथून सध्या जनशताब्दी एक्स्प्रेस विजेवर धावत आहे. या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे ‘वंदे भारत’ ही आठ डब्यांची रेल्वे गुरुवारी (ता. २८) मराठवाड्यात दाखल झाली. या रेल्वेची जालना ते मनमाडदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. शनिवारी (ता. ३०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचे ऑनलाईन पद्धताने लोकार्पण होणार आहे.

जालना ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेची रॅक ही मध्य रेल्वे विभागाकडून बुधवारी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे आणण्यात आली. जालना येथे गेल्यानंतर, ही रेल्वे ‘टेस्ट रन’साठी सकाळी १०.१० वाजता मनमाडकडे निघाली. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान परसोडा या रेल्वे स्टेशनवर ती थांबविण्यात आली. दुपारी ४.१५ वाजता ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे पोचली. या टेस्ट रनच्या दरम्यान या रेल्वेचा वेग, ट्रॅकची पाहणी आणि इतर सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. यावेळी लोको पायलट गुलाब बाबू, राजकुमार, ज्ञानेश्वर इंगळे, कल्पना घनावत, सीसीएल जी. व्ही. गोरे आणि अनिल मिश्रा यांनी रेल्वेच्या टेस्ट रनमध्ये भाग घेतला.

अशी धावणार ‘वंदे भारत’

जालना ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ही रेल्वे सकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी जालना येथून निघेल. छत्रपती संभाजीनगरला ही रेल्वे ५ वाजून ५३ ला पोचेल. मनमाडला ७.४० वाजताच्या दरम्यान पोचणार आहे. नाशिक रोडला ८.३८च्या दरम्यान तर कल्याणला १०.५५ च्या सुमारास पोचेल. नंतर ठाणे ११.१०, दादर ११.३२ आणि मुंबई सीएसटीएमला ११.५५ला पोचेल.

मराठवाडा रेल्वे कृती समितीकडून स्वागत

लोकोपायलट आणि अधिकाऱ्यांचे स्वागत मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, रेल्वे अभ्यासक स्वानंद साळुंके, भाजप रेल्वे प्रकोष्ट समितीचे ग्रामीण अध्यक्ष विजय नलावडे यांनी टेस्ट रन यशस्वी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुष्पहाराने स्वागत केले.

दरवाजाचे नियंत्रण गार्डकडे

ही रेल्वे जालना, छत्रपती, संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई या स्थानकांवरून धावणार आहे. यात गाडीला आठ डबे असून, एका डब्यात ४५ खुर्च्या आहेत; तसेच प्रत्येक स्थानकावर ही रेल्वे केवळ दोन मिनिटांसाठी थांबणार आहे. रेल्वेतील प्रत्येक दरवाजाचे नियंत्रण हे गार्ड यांच्याकडे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT