sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जायकवाडी परिसरात कांदा लागवडीला वेग

सकाळ वृत्तसेवा

जायकवाडी : रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांदा पिकाच्या लागवडीला जायकवाडी परिसरात वेग आला आहे. यावर्षी पाऊस अनियमित राहिल्याने शेतकऱ्यांच्या हाती खरीप पिके आली नाहीत. तरी हे बाजूला सारून शेतकऱ्यांनी रब्बीच्या गहू, ज्वारी, हरभऱ्याची पेरणी केली. सध्या थंडीचा जोर वाढल्याने शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त आहेत. बहुतांश शेतकरी कपाशी काढून दुबार पीक म्हणून कांदा लागवड करतात. तर काही शेतकरी गादी वाफा, खोडवा उसात आंतरपीक म्हणून कांदा लावून चांगले उत्पादन साधतात.

सध्या एकाचवेळी सर्वत्र कांदा लागवडीची लगबग सुरू असल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे कांदा लावण्यासाठी साधारण एकरी दहा ते बारा हजार रुपये मजुरी द्यावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर यावर्षी खरिपात झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांना कांदा पिकांकडून मात्र अपेक्षा वाढल्या आहेत.

मागीलवर्षी मी दोन एकर कांदा लावला होता. परंतु, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे कमी कांदा लागवड केली आहे. त्यालाही लागवडीसाठी मजूर मिळणे कठीण आहे. एकरी बारा हजार रुपये मजुरी देऊन लागवड करावी लागत आहे.

— काकासाहेब नाटकर, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT