पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर 
छत्रपती संभाजीनगर

पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर (वय ७२) Journalist Subhashchandra Wagholikar यांचे आज रविवारी (ता.चार) पहाटे एक वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वाघोलीकर हे मूळचे नाशिकचे Nashik. त्यांनी सुरुवातीला नाशिकला 'गावकरी' दैनिकमध्ये पत्रकारिता केली. त्यानंतर वाघोलीकर यांनी औरंगाबाद येथील प्रतिष्ठित मराठवाडा आणि त्यानंतर लोकमतमध्ये पत्रकारिता केली.लोकमतच्या संपादक पदावरून ते निवृत्त झाले होते. अनेक सामाजिक आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. समाजवादी विचाराचे असलेले वाघोलीकर यांनी अखेरपर्यंत पत्रकारितेशी बांधिलकी राखली. journalist subhashchandra wagholikar passed away at 72 age

एक्झिट मनाला चटका लावणारी!

अतिशय प्रामाणिक नि धारदार नि शैलीदार लेखणीचे धनी वाघोलीकर यांनी आपली पत्रकारिता नाशिकच्या 'गावकरी'मध्ये सुरू केली. दै. मराठवाडाचे थोर संपादक अनंत भालेराव यांच्या लढाऊ दैनिकाशी वैचारिक नाळ जुळत असल्यानं ते दै. मराठवाडामध्ये आले नि धारदार लेखनशैलीनं वाचकांमध्ये आपली विशिष्ट ओळख निर्माण करू शकले. विविध विषयांवरचं गंभीर व विपूल वाचन हे त्यांचे वेगळेपण होते. ते लेखनातही प्रतिबिंबित व्हायचं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आमच्या तासन् तास गप्पांचे प्रसंग मला आठवत आहेत. आपली मतं परखडपणे ते मांडीत. पण जातीपाती धर्माचा पूर्वग्रह नि फालतूचा अहंकार कधीच नव्हता. दै. लोकमतमध्येही त्यांनी उत्तम कामगिरी केली. आपल्या कामात सदैव मग्न असणारे वाघोलीकर मोजक्यांकडेच आपलं मन मोकळं करीत असत. त्यातील मी एक होतो. कधीही उथळमाथळ बोलणं नि लिहिणं नसणारे व आपल्या ख़ास धारदार कमावलेल्या वाघोलीकर शैलीत लिहिणारे नि बोलणारे गंभीर प्रकृतीचे प्रगल्भ संपादक आज विरळ होत असताना वाघोलीकर यांची अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. आदरांजली ..!, अशा भावना महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे माजी कुलगुरु सुधीर गव्हाणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT