just one loan approve youth trap crime fraud police  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Loan News : झटपट कर्जे अमाप, पालकांना वाढला ताप; तरुणाई विळख्यात

कर्ज घ्यायचे म्हटले की बँकेत ओळख, दोन जामीनदार, हप्त्याची जुळणी, सामाजिक प्रतिष्ठा अशा अनेक गोष्टी आता मागे पडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कर्ज घ्यायचे म्हटले की बँकेत ओळख, दोन जामीनदार, हप्त्याची जुळणी, सामाजिक प्रतिष्ठा अशा अनेक गोष्टी आता मागे पडत आहेत. सध्या नवनव्या ऑनलाइन कंपन्यांकडून मोबाइलच्या एका क्लिकवर झटपट कर्जाचा फंडा सुरू आहे.

या कर्जामुळे तरुणाईला रक्कम उचलण्याची चटक लागल्याचे दिसून येते. मात्र, या कर्जामागील १८ ते ३६ टक्के व्याजाचा ससेमिरा घेऊन कंपनीचे वसुली कर्मचारी दारात येताच पालकांची त्रेधा उडत आहे.

एक हजार रुपयांची कर्ज घ्या, ते फेडा, पुढील कर्ज पाच हजार घ्या आणि ते फेडा अशी रक्कम वाढत जाऊन ३० हजारांपर्यंतचे पर्सनल लोन सहज मिळवा, अशा फंदात सध्या तरुणाई गुरफटली आहे. मागील महिन्यात याचे पेव फुटल्याचे दिसत आहे. वसुली करणारे दारात येऊन उभे राहत असल्याने पालकांच्या तोंडचे पाणी पळत आहे. यातून वादावादीचेही प्रकार घडत आहेत.

कर्जाच्या परतफेडीची खात्री काय?

केवळ दोन कागदपत्रांच्या आधारे कंपन्यांचे कर्मचारी कर्जे वाटप करत आहेत. यातून चैनीसाठी अशी कर्जे उचलणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कर्जाची परतफेड करण्याचे उत्पन्‍नाचे मार्ग नसणाऱ्यांना अशी खिरापत वाटून या कंपन्यांनी मात्र आपली उद्दिष्ट्ये साधल्याचे चित्र आहे.

पेपरलेस, पाच मिनिटांत कर्ज

त्वरित कर्जे देताना अवघ्या पाच मिनिटांत जलद आणि पेपरलेस कर्जाची रक्कम ग्राहकाला दिली जात आहे. ऑनलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करून कर्ज पुरवले जाते आहे. १२ महिन्यांच्या कालावधीसाठी ३० ते ३६ टक्के व्याजाने आपण हे कर्ज घेत असल्याची समोरच्याला पुसटशी कल्पनाही नसते.

पालकांच्या अपरोक्ष मुले परस्पर अशी कर्जे उचलत आहेत. या व्यवहाराची कोणतीच कल्पना घरच्यांना नसते. अशावेळी वसुलीसाठी येणाऱ्यांना कुटुंबीयांना तोंड द्यावे लागत आहे. या पैशांचा मुलाने कशासाठी वापर केला, हे विचारण्याऐवजी पालक प्रतिष्ठेपोटी ही कर्जे स्वतःच भागवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT