Kham River Project 
छत्रपती संभाजीनगर

Kham River Project : खाम नदी प्रकल्पाचा अमेरिकेत गौरव,पटकावला आंतरराष्ट्रीय पुरस्कार अन् २५ हजार डॉलर्सचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने नागरिकांच्या सहभागातून राबविलेल्या खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीजसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्याचे २५ सप्टेंबरला न्यूयॉर्क येथे वितरण करण्यात आले. त्यात २५ हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले.

खाम नदी पुनरुज्जीवन मोहीम महापालिका, छावणी परिषद, व्हेरॉक कंपनी आणि इकोसत्त्व यांच्या माध्यमातून २०२१ पासून राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत खाम नदीपात्रातून शेकडो ट्रक कचरा उचलून नदीचे पात्र मोकळे करण्यात आले आहे. आता नदी पात्रातून स्वच्छ पाणी वाहत आहे. जागोजागी बंधारे तयार करण्यात आल्यामुळे पक्षी, प्राण्यांचा वावर वाढला आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू करण्यात आली. पुरस्काराबद्दल महापालिकेने कळविल्या माहितीनुसार, यंदा या पुरस्काराची ‘हवामानासाठी सज्ज समुदायांना गती देणे’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. त्यानुसार खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ६२ देशातील १४८ शहरांच्या दोनशे प्रकल्पामधून पहिल्या पाच प्रकल्पांमध्ये निवडला गेला.

न्यूयॉर्क येथे २५ सप्टेंबरला या उपक्रमात सहभागी संस्था इकोसत्वच्या संस्थापक नताशा जरीन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगरसह न्यूयॉर्क, ब्राझील, अर्जेंटिना, नॉर्वे या देशांच्या प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारामुळे छत्रपती संभाजीनगर जागतिक नकाशावर आले आहे, ही शहरासाठी गौरवाची बाब आहे असे मत महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

'सारं काही तिच्यासाठी' फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म; मुलगा की मुलगी?

Assembly Elections 2024 : तुमचं बर हाय, आमची फरपट कवा थांबणार? भोकर मतदारसंघात भावी आमदारांची गर्दी, मूलभूत गरजांची वाणवा

Navratri Recipe : नवरात्रीचा उपवास! सोप्या पद्धतीने घरी बनवा पौष्टिक उपवासाची खांडवी

Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT