औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात किर्तनकार बाबा व महिलेचा अश्लील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओत त्या बाबाबरोबर नको त्या अवस्थेत दिसणारी महिला देखील किर्तनकार आहे. या प्रकरणी त्या किर्तनकारासह महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचेही यूट्यूबवर (YouTube) मोठ्या संख्येने फाॅलोअर्स आहेत. तसेच त्यांना मानणारा औरंगाबाद जिल्ह्यात मोठा भक्तगण आहे. (Kirtankar Maharaj Viral Video Cases Filed Against Man And Woman In Shillegaon Police Station Of Aurangabad)
व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर आपली बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यावर किर्तनकार महिलेने विषप्रशान करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी किर्तनकार महाराज व महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. शेवटी ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरुन किर्तनकार महाराजासह महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे करित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.