Kunbi Caste Certificate Only 297 evidences of Kunbi were found in Chhatrapati Sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Kunbi Caste Certificate : कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘कुणबी’बाबतचे फक्त २९७ पुरावे आढळले

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने कुणबी नोंदीचे अभिलेखे तपासण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील १५ लाख १६ हजार ८१९ महसूल व शैक्षणिक अभिलेख जिल्हा प्रशासनाच्या पथकाने तपासले आहेत. यात कुणबी अशी नोंद असलेले फक्त २९७ पुरावे आढळले आहेत.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने कुणबी नोंदीचे अभिलेखे तपासण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अभिलेख तपासण्याचे काम पूर्णत्वास आले असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. आत्तापर्यंत झालेली तपासणी, आढळून आलेल्या नोंदीची माहिती विभागीय प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत सहा हजार अभिलेखांमध्ये कुणबी नोंद आढळून आली आहे. ३० सप्टेंबरला मुख्य समितीच्या बैठकीत विभागातील संपूर्ण माहिती सादर करण्यात येणार आहे.

दृष्टिक्षेपात

महसूल पुरावे : ४३

शालेय पुरावे : ६४

कारागृह : १४

जात वैधता प्रमाणपत्र : १५१

भूमी अभिलेख व इतर : २५

एकूण : २९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parvati Vidhan Sabha Nivadnuk: विधानसभेपूर्वी पुण्यात राजकीय वातावरण तापले! पर्वतीत लागले सांगली पॅटर्नचे फ्लेक्स, नेमकं रहस्य काय?

Amit Thackeray: "माघार घेण्याचा प्रश्नच नाही," अमित ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंचा उमेदवार लढणारच

रात्रीत बदलला पक्ष; सोनिया गांधी, विलासरावांनी दाखवला हिरवा कंदील अन् तब्बल 24 वर्षांनी 'ती' जागा काँग्रेसने जिंकली

IPL Retention 2025: मुंबईचा महागडा खेळाडू Jasprit Bumrah ची रिटेंशनबाबत प्रतिक्रिया, Video Viral

Bhool Bhulaiyaa 3 Twitter Reaction: कुणी म्हणतंय जबरदस्त तर कुणी... कसा आहे 'भूल भुलैया ३'? वाचा ट्विटर रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT