Bidkin  sakal
छत्रपती संभाजीनगर

Bidkin : जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

येथील पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणारी ७०० व्यासाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.आज पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील ढोरकिन येथील बाजारळ परिसरात जुनी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी निखळून लाखो लिटर पाणी वाया जात होते.

सकाळ वृत्तसेवा

बिडकिन : येथील पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणारी ७०० व्यासाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.आज पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील ढोरकिन येथील बाजारळ परिसरात जुनी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी निखळून लाखो लिटर पाणी वाया जात होते.

दिवसभरातील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याची हि दुसरी घटना समोर आली आहे.बिडकिन गावानजिक असलेल्या पुलाजवळ जलवाहिनीच्या पाइपलाइन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे ये-जा करत असलेल्या दुचाकी व चारचाकी आणि इतर वाहनांवर

पडत होते.फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची हि सहावी घटना असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे.वारंवार जलवाहिनीच्या दुरुस्ती ची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असताना हि जलवाहिनी फुटायची वेळ चुकत नाही.दोन्ही घटनास्थळी महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी आणि फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील स्थानिक कर्मचारी यांच्या वतीने दुरुस्ती चे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT