leopard esakal
छत्रपती संभाजीनगर

Leopard : ‘तो’ सध्या काय करतो? बिबटोबाची शहरात पुन्हा चर्चा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कधी ‘तो’ उल्कानगरीत दिसतो, तर कधी एसटीच्या कार्यशाळेत. पुन्हा दुसऱ्या दिवशी एखाद्या हॉटेलवाल्याला त्याचे सीसीटीव्हीत दर्शन होते आणि दोन-चार दिवसांच्या अंतराने पुन्हा एमआयडीसीत तो ‘अवतरतो’!

प्रत्यक्ष पाहिल्याचे मात्र कुणीही छातीठोकपणे सांगत नाही. ‘तो मला दिसला’ म्हणणारा थोड्याच वेळात ‘दिसल्यासारखा झाला’, असे वाक्यही फिरवितो! म्हणून अवघ्या शहरवासीयांना सध्या पडलेला प्रश्न म्हणजे...‘तो’ सध्या काय करतो?’ यात भटकंती सुरू आहे ती वन विभागाची.

पंधरा जुलैपासून संपूर्ण शहराची चिंता वाढवणाऱ्या बिबट्याची चर्चा २३ जुलैपर्यंत ओसरली. तो शनिवारी पुन्हा चिकलठाणा एमआयडीसीकडे दिसल्याचा दावा आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी केली. वन विभागाने संपूर्ण एमआयडीसी चिकलठाणा परिसर धुंडाळला. पण, बिबट्याचा वावर असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. मात्र, यानिमित्ताने शहरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली.

शनिवारी चिकलठाणा एमआयडीसीमधील एनएचके कंपनी परिसरात सकाळी ६ः४० च्या सुमारास बिबट्या दिसल्याचा दावा कंपनी कर्मचाऱ्यांनी केला. वन विभागाने तातडीने दखल घेत धाव घेतली.

वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने एनएचके कंपनीसह इथल्या संपूर्ण परिसरात बिबट्याचा शोध घेतला. इथल्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने इथे बिबट्या असण्याची शक्यता होती. त्यामुळे वन विभागाने इथले सीसीटीव्ही तपासले आणि सायंकाळपर्यंत संपूर्ण कंपन्यांची पाहणी केली.

विशेष म्हणजे चारही आरएफओ यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी अगदी कलाग्रामपर्यंत परिसर धुंडाळला. पण, बिबट्या दिसला नाही. शहरात १५ जुलै रोजी उल्कानगरीमध्ये बिबट्या दिसल्याचे सीसीटीव्ही फुटेज दिसले होते.

त्यानंतर १७ जुलैला बिबट्या प्रोझोन मॉल आणि एन-वनमधून जाताना दिसला. त्यानंतर बिबट्याचे कोणतेही फुटेज दिसले नाही. तरीही वन विभाग नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक कॉलची चौकशी करत असून लोकेशनवरही जात आहे. उल्कानगरी, एसटी वर्कशॉपसह अन्य ठिकाणी लावण्यात आलेले पिंजरे वन विभागाने अजूनही तसेच ठेवले आहेत.

वन विभागाच्या चार टीम अजूनही रात्री गस्त घालत असून बिबट्या असू शकेल अशा संभाव्य ठिकाणांवर शोध सुरू आहे. एनएचके कंपनीजवळ सकाळी ६ः४० च्या दरम्यान बिबट्या दिसल्याचा दावा बालाजी कदम या प्रत्यक्षदर्शींनी केला. माझ्यासह जवळपास १०० लोकांनी बिबट्या पाहिला. आम्ही बिबट्याला हुसकावून लावले, असेही ते म्हणाले. दरम्यान, रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर येथील बनेवाडी परिसरात देखील बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे.

१९२६ वर साधा संपर्क

वन्यप्राणी दिसल्यास नागरिकांनी वन विभागाला १९२६ या टोल फ्री नंबरवर किंवा वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांना ९५७९२७१५५२ या क्रमांकावर संपर्क करावा. 

गोशाळेतील वासराचा पाडला फडशा

बाजार सावंगी (बातमीदार) : खुलताबाद तालुक्यातील बाणेश्वर डोंगरावर पुरातन बाणेश्वर महादेव मंदिर आहे. येथे स्वामी नामदेव गिरी महाराज हे गोशाळा चालवतात. या गोशाळेतून बिबट्याने शुक्रवारी (ता.२६) रात्री वासराला फरफटत नेऊन त्याचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

स्वामी नामदेव गिरी महाराजांनी याची माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास येऊन बाणेश्वर डोंगर परिसरात पाहणी केली. यावेळी पायाच्या ठशावरून बिबट्यानेच वासराचा फडशा पाडल्याचे निष्पन्न झाले. बाणेश्वर डोंगराच्या पायथ्याशी कनकशीळ गाव असून ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन स्वामी नामदेव गिरी महाराजांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

१५ जुलैपासून वन विभाग बिबट्याच्या शोधात आहे. आम्ही अजूनही रात्री शहरातील वेगवेगळ्या भागांत गस्त घालतो. शनिवारी चिकलठाणा एमआयडीसीतील एनएचके कंपनीजवळ बिबट्या आहे असा फोन आल्यानंतर आम्ही तत्काळ या परिसरातील दोन किलोमीटर परिसरात बिबट्याचा शोध घेतला. बिबट्याचे ठसे दिसतात का बघितले. आसपासचे सर्व सीसीटीव्ही तपासले. पण, बिबट्या दिसला नाही. तरीही आमचा शोध सुरू आहे.

- दादासाहेब तौर, वनपरिक्षेत्र अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

Dharmaveer 2 : खोट बोलावं पण किती? धर्मवीर 2 मधला राज ठाकरेंवरचा 'तो' सीन होतोय प्रचंड ट्रोल

Latest Maharashtra News Live Updates : मराठा, ओबीसी समाजापाठोपाठ आता नाभिक समाजाचे आंदोलन

BB Marathi Voting Trends: सुरज टॉपवर पण सगळ्यात कमी मतं कुणाला? शेवटच्या आठवड्यात हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये

IND vs BAN 2nd Test : मोठे अपडेट्स : भारतीय संघ Kanpur स्टेडियमवरून हॉटेलमध्ये परतला; आजचा खेळ होण्यावर शंका

SCROLL FOR NEXT