मेंढीचा पाडला फडशा, टेंभा पेटवून मेंढपाळांनी काढली रात्र Leopard stay now in Patoda Shivara  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : बिबट्याचा मुक्काम आता पाटोदा शिवारात

मेंढीचा पाडला फडशा, टेंभा पेटवून मेंढपाळांनी काढली रात्र

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : वळदगावनंतर बिबट्याने आता पाटोदा-गंगापूर (नेहरी) शिवारात मुक्काम ठोकला. दरम्यान या बिबट्याने एका गायीवर हल्ला करून एका मेंढीचा फडशा पाडला. यावेळी थरकाप उडालेल्या चार मेंढपाळांनी रात्रभर टेंभा पेटवून स्वतः सह ३०० शेळ्या-मेंढ्यांचे संरक्षण केले. हा थरारक प्रकार रविवारी (ता.१२) झाला.

पाटोदा येथील अशोक कचरु पेरे यांच्या शेतात गट नंबर ९४ मध्ये गणोरी येथील मेंढपाळांनी ३०० शेळ्यामेंढ्याचे आखार बसवले आहे. रविवारी (ता.१२) सायंकाळी बिबट्याच्या डरकाळ्या या मेंढपाळांनी ऐकल्या. त्यामुळे कचरु विठोबा सोनवणे, भगवान उमाजी सोरमारे, मच्छिंद्र एकनाथ महानोर, लताबाई कचरु सोनवणे या मेंढपाळांचा चांगलाच थरकाप उडाला. दरम्यान या बिबट्याने कपाशीच्या शेतात बांधलेल्या गायीवर हल्ला केला.

मात्र गाय दोरी तोडून पळाली. मात्र दोन पिल्लं असलेल्या एका मेंढीचा या बिबट्याने फडशा पाडला. बिबट्या आल्याचे समजताच मेंढपाळांनी टेंभा पेटवून रात्रभर स्वतः सह ३०० शेळ्या मेंढ्याचे रक्षण केले. तरीही बिबट्या वाघोरी भोवती चकरा मारत होता. शेवटी तो पहाटे कपाशीतून मोसंबीच्या शेतातून निघून गेला. सोमवारी सकाळी अशोक पेरे हे शेतात गेले असता हा थरारक प्रकार उघडकीस आला. पाटोदा शिवारात बिबट्या असल्याची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळादे, दौलताबाद वनविभागाचे वनपाल एस टी काळे, वनरक्षक आर एस मुळे यांनी कर्मचार्यांसह धाव घेत घटनास्थळी असलेल्या पाऊल खुणाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT