Letest News about Habeas Corpus Petition Dismissed 
छत्रपती संभाजीनगर

दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - सुरक्षारक्षक असणाऱ्या याचिकाकर्त्याची पत्नी जुलै 2019 मध्ये बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना पत्नीचा शोध लागला नाही. प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. 

खंडपीठाच्या आदेशानुसार, पोलिसांनी याचिकाकर्त्याच्या पत्नीचा शोध घेऊन तिला बाळासह खंडपीठात हजर केले. सुनावणीदरम्यान संबंधित पत्नीने आपण स्वतःहून पुण्यात विभक्त राहत आहे आणि पतीपासूनही विभक्त राहावयाचे असल्याचे खंडपीठात निवेदन केले. दरम्यान, न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी सदर म्हणणे ऐकून घेऊन याचिका निकाली काढली. 

या प्रकरणात रामराव मारुती घुले (रा. मूळ परभणी जिल्हा. ह. मु. उस्मानपुरा) हा तरुण उस्मानपुऱ्यातील बॅंकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. जुलै महिन्यात त्याची पत्नी अश्‍विनी घुले ही 10 महिन्यांच्या बाळाला घेऊन राहत्या घरून बेपत्ता झाली. प्रकरणात रामराव याने 17 जुलै 2019 रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 17 जुलैपासून अद्यापपर्यंत फिर्यादी पतीने संबंधित पोलिस ठाण्यात पत्नीच्या तपासासंदर्भात चौकशी केली. मात्र पत्नीचा तपास न लागल्याने पती रामराव घुले याने ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यातर्फे औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने औरंगाबाद पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक, महाराष्ट्र शासन यांना संबंधित सुरक्षारक्षक पतीने तक्रार दाखल केल्यापासून बेपत्ता पत्नीचा शोध घेतला का? तपासाबाबत नेमकी कोणती पावले उचलली, याविषयीचा अहवाल खंडपीठात सादर करावा, असे आदेश दिले होते. सुनावणीदरम्यान संबंधित पत्नी सज्ञान असल्याने तिला न्यायालयाने विचारणा केली असता, तिने विभक्त राहणार असल्याचे निवेदन केले. दरम्यान, खंडपीठाने याचिका निकाली काढली. रामराव घुले यांच्यातर्फे ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

Uddhav Thackeray : भाजपचा ‘सत्ता जिहाद’ महाराष्ट्राची जनता संपवेल! : उद्धव ठाकरेंची गर्जना

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 नोव्हेंबर 2024

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ नोव्हेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२४)

SCROLL FOR NEXT